AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Year 2006 : नव्या वर्षात धनसंपत्ती हवीय? 31 डिसेंबरची रात्र फार महत्त्वाची; एक गोष्ट करताच पडेल पैशांचा पाऊस!

नवे वर्ष चांगले जावे यासाठी आपण नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या पूजा करतो. परंतु या पूजेच्या अगोदर 31 डिसेंबर रोजी काही उपाय केल्यास तुमचा धनसंपत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

New Year 2006 : नव्या वर्षात धनसंपत्ती हवीय? 31 डिसेंबरची रात्र फार महत्त्वाची; एक गोष्ट करताच पडेल पैशांचा पाऊस!
happy new yearImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 31, 2025 | 2:48 PM
Share

New Year Welcome 2026 : अवघ्या काही तासांनी आता नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. 2025 साल सरले असून आता सगळेच 2026 सालाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. हे नवे वर्ष चांगले जावे यासाठी अनेकजण वेगवेगळे पूजापाठ करतात. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही पूजा केली जाते. दरम्यान, या वर्षी मात्र नवे वर्ष सुखात आणि समाधानात जावे यासाठी 2025 सालाचा 31 डिसेंबर हा दिवस फारच महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी काही पूजा केल्यास तुमचे नवे वर्ष फारच आनंदी आणि सुखात जाणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी नेमके काय करावे? हे जाणून घेऊ या….

भगवान विष्णूचा जप केल्यास नवे वर्ष आनंदात जाणार

31 डिसेंबर रोजीच्या रात्री काही विधी करणे फार गरजेचे आहे. हे विधी केल्यावर तुमचे नवे वर्ष हर्षोल्हासात जाऊ शकते. 31 डिसेंबर हा पौष पुत्रदा एकादशीचा दिवस आहे. एकादशी हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी काही खास उपाय करावे लागतात. 31 डिसेंबरच्या रात्री जागरण करावे. सोबतच जागरण करताना भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा. या दिवशी जी व्यक्ती श्रीहरीची पूजा करतो त्याच्यावर लक्ष्मीमाता प्रसन्न असते. पौष पुत्रदा एकदशी च्या रात्री पूजेच्या स्थळी तांदळाचा ढीग तयार करा. त्यानंतर दिवा चालू करून श्रीसुक्ताचा जप करावा. त्यानंतर 1 जानेवारी रोजी प्रसाद म्हणून भाताचे दान करावे. हा उपाय केल्याने काही कार्यांना गती मिळते, असे सांगितले जात. सोबतच व्यवसायात प्रगती होते, असेही म्हटले जाते.

..तर विघ्न दूर होणार

एखाद्या व्यक्तीला धनप्राप्तीमध्ये अडथळा येत असेल तर त्या व्यक्तीने 2025 वर्षाच्या रात्री एक मातीचे भांडे घ्यावे. त्या भांड्यात गहू भरावा. त्यानंतर हे मातीचे भांडे देवघरातील मंदिरात घेऊन जावे. थोड्या वेळानंतर हेच गहू गरजू व्यक्तीला दान करावे. असे केल्यास धनसंपत्तीत अडथळा ठरणारे विघ्न दूर होऊ शकते, असे सांगितले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!