AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar OTT Release : धुरंधरने पाकिस्तान्यांना वेड लावलं, अखेर तिथल्या लोकांच्या मनात होतं ते बाहेर आलं

Dhurandhar OTT Release : या चित्रपटाची स्टोरी भारत-पाकिस्तानमधील हेरगिरी आणि अँटी टेररिज्म ऑपरेशनच्या आसपास फिरते. यात मुख्य पात्र भारताचा एजंट पाकिस्तानात घुसून त्यांच्या दहशतवादी नेटवर्कची माहिती गोळा करतो.

Dhurandhar OTT Release : धुरंधरने पाकिस्तान्यांना वेड लावलं, अखेर तिथल्या लोकांच्या मनात होतं ते बाहेर आलं
dhurandhar
| Updated on: Feb 02, 2026 | 5:21 PM
Share

Dhurandhar Film in Pakistan : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटावर फक्त भारतातूनच नाही, तर जगभरातून पसंतीची मोहोर उमटली. हा हाय बजेट स्पाय थ्रिलर चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी भारतीय थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान हिट ठरला. या चित्रपटाने 1300 कोटी रुपयापेक्षा जास्त कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झालाय. धुरंधर चित्रपट 30 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. जे लोक थिएटरला जाऊन हा चित्रपट पाहू शकले नाहीत. ते ओटीटीवर हा चित्रपट पहातायत. ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर धुरंधर नेटफ्लिक्सवर ट्रेंड करतोय. भारतासोबतच शेजारच्या पाकिस्तानातही हा चित्रपट खूप पाहिला जातोय.

नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर धुरंधर पाकिस्तानात नंबर 1 ट्रेंडवर पोहोचलाय. पाकिस्तानातल्या थिएटरमध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटवरुन हे स्पष्ट होतय की, पाकिस्तानातील लोक मोठ्या प्रमाणात नेटफ्लिक्सवरील हा चित्रपट बघतायत. पाकिस्तानात धुरंधर नेटफ्लिक्सच्या ट्रेडिंग लिस्टमध्ये सर्वात वर आहे.

चित्रपट रिलीज करायला परवानगी मिळाली नव्हती

धुरंधर चित्रपट अधिकृतरित्या पाकिस्तानात रिलीज झालेला नाही. या चित्रपटाची स्टोरी भारत-पाकिस्तानमधील हेरगिरी आणि अँटी टेररिज्म ऑपरेशनच्या आसपास फिरते. यात मुख्य पात्र भारताचा एजंट पाकिस्तानात घुसून त्यांच्या दहशतवादी नेटवर्कची माहिती गोळा करतो. म्हणूनच पाकिस्तान आणि मिडिल ईस्टमधील काही देशात हा चित्रपट रिलीज करायला परवानगी मिळाली नाही.

दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलय

या चित्रपटात रणवीर सिंह स्पायच्या रोलमध्ये आहे. अक्षय खन्ना रहमान डकैतची भूमिका साकारतोय. दोन्ही रोल प्रेक्षकांना भरपूर आवडलेत. सोबतच या चित्रपटात अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, संजय दत्त, आर माधवन आणि सारा अर्जुन यांनी दमदार अभिनय करुन प्रेक्षकांचं मन जिंकलय.

दुसरा पार्ट कधी?

नेटफ्लिक्स वर या फिल्मचा रनटाइम 3 तास 25 मिनिटं आहे. थिएटरमध्ये चित्रपटाचा रनटाइम 3 तास 34 मिनिट आहे. फिल्मने वर्ल्डवाइड जवळपास 1300 कोटी रुपयाची कमाई केली आहे. भारतात या फिल्मने 1000 कोटीचा आकडा पार केलाय. फिल्मचा दुसरा पार्ट 2026 मार्च मध्ये येईल. फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पहातायत.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?.