RHTDM 2 | ‘रहना है तेरे दिल में’चा सिक्वेल, दिया-माधवनला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न फेल

आघाडीची अभिनेत्री कृती सॅनन रहना है तेरे दिल मेच्या सिक्वेलमध्ये दिया मिर्झाची भूमिका साकारणार आहे. (Rehna Hai Tere Dil Mein Movie Sequel)

RHTDM 2 | 'रहना है तेरे दिल में'चा सिक्वेल, दिया-माधवनला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न फेल

मुंबई : 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रहना है तेरे दिल में’ (Rehna Hai Tere Dil Mein) चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. आर माधवन (R Madhavan), दिया मिर्झा (Dia Mirza) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी केली नाही, परंतु प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं. RHTDM या शॉर्टफॉर्मने सिनेमा लोकप्रिय झाला. याच सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिया आणि माधवन यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही. (Dia Mirza R Madhavan starrer Rehna Hai Tere Dil Mein Movie Sequel)

वीस वर्षांत एकदाच दिया-मॅडी एकत्र

चित्रटगृहात जाऊन प्रेक्षकांनी ‘रहना है तेरे दिल में’ पाहिला नसल्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन दिसतं. मात्र टीव्हीवर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमावर भरभरुन उड्या पडल्या. त्यानंतर आर माधवन आणि दिया मिर्झाच्या चाहत्यांमध्येही वाढ झाली. दिया-माधवन यांचं करिअर या सिनेमामुळे आकारास आलं. वीस वर्षांच्या काळात दोघं एकाही सिनेमात पुन्हा एकत्र झळकले नाहीत. मात्र माधवन अनेकदा इन्स्टाग्रामवर या सिनेमाचं स्मरणरंजन करतो. आता ‘रहना है तेरे दिल में’चा सिक्वेल भेटीला येणार आहे.

दिया-माधवनला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न

आघाडीची अभिनेत्री कृती सॅनन रहना है तेरे दिल मेच्या सिक्वेलमध्ये दिया मिर्झाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे मूळ निर्माते वासू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानीच सिनेमाचा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत आहे.

आर माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खान यांनाच सिनेमाच्या सिक्वेलमध्ये घेण्याची जॅकीची इच्छा होती. वीस वर्षांनंतरची कथा दाखवण्याचा त्याचा प्लॅन होता. जॅकी लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच जवळपास गेल्या वर्षभरापासून या प्रोजेक्टवर काम करत आहे. मात्र तिघांना पुन्हा एकत्र आणण्याचा त्याचा प्लॅन यशस्वी होत नव्हता. त्यामुळे जॅकीने ही योजना ड्रॉप केली आणि नवी कहाणी पडद्यावर साकारण्याचा चंग बांधला. (Dia Mirza R Madhavan starrer Rehna Hai Tere Dil Mein Movie Sequel)

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

वासू भगनानींच्या मुलाचा ड्रीम प्रोजेक्ट

सूत्रांच्या माहितीनुसार कृती सॅननची निवड पक्की झाली आहे. तर दोघा अभिनेत्यांची निवड होणं अद्याप बाकी आहे. मात्र सिनेमाच्या प्रमोशनसाठी माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खान यांना विचारणा केली जाऊ शकते.

संबंधित बातम्या :

11 वर्षाचं प्रेमाचं नातं, अवघ्या 5 वर्षात ‘घटस्फोट’, वाचा दिया मिर्झाची पहिली प्रेमकथा…

(Dia Mirza R Madhavan starrer Rehna Hai Tere Dil Mein Movie Sequel)

Published On - 1:49 pm, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI