मुंबई लोकलमध्ये अजय देवगनच्या अभिनेत्रीसोबत घडलेली नको ती घटना; म्हणाली…
Actress Horrifying Experience: ट्रेन, बस आणि सार्वजनिक ठिकाणी कायम महिलांना नको त्या घटना घडत असतात. अभिनेता अजय देवगन याच्या अभिनेत्रीसोबत देखील असंच काही घडलं... अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे 21 दशकात महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न कायम डोकंवर काढतो. ट्रेन, बस आणि सार्वजनिक ठिकाणी कायम महिलांना नको त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. असंच काही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. नुकताच अभिनेत्रीने कॉलेजच्या दिवसांमध्ये तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली आहे. शिवाय सडपातळ असल्यामुळे अभिनेत्रीला कायम ट्रेलिंगचा सामना करावा लागला. यावर देखील अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री डायना पेंटी आहे. नुकताच झालेल्य मुलाखतीत अभिनेत्रीने मुंबईच्या लोकलमध्ये तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तिची छेड काढली जायची ज्यामुळे डायना प्रचंड घाबरायची.
डायना पेंटी म्हणाली, ‘मला असं वाटतं की मुंबईतील प्रत्येक मुलीने अशा परिस्थितीचा सामना केला आहे. कॉलेज सेंट झेवियर्सला जाण्यासाठी, मी भायखळा ते व्हीटी सेंट्रल लाईनने ट्रेन पकडायची आणि नंतर कॉलेजला चालत जायची. तिथे छेडछाड व्हायची आणि लोक मला कोपर मारण्याचा प्रयत्न करायचे. तो प्रसंग रोजच्या जीवनाचा एक भाग झाला होता.’
View this post on Instagram
‘मी प्रचंड शांत होती. माझ्यामध्या आत्मविश्वास तर नव्हताच… मी स्वतःला लपवून ठेवायची. त्यामुळे मला भीती वाटायची. त्यांना परत कोपर मारण्याचा देखील आत्मविश्वास माझ्यात नव्हता.’ पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी सडपातळ होती. ज्यामुळे मला ट्रोल केलं जायचं.’
‘या सगळ्यामुळे मला प्रचंड त्रास व्हायचा. तर लोकं सतत तुम्हाला बोलत राहिली किती बारीक आहे, काही खात नाही का? काही काकू माझ्या आईला विचारायच्या तुम्ही मुलीला काही खायला देत नाही का? या सर्व गोष्टींना मी कंटाळली होती.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
डायना पेंटी हिचं वर्कफ्रंट
डायना पेंटी हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता अजय देवगन स्टारर ‘आझाद’ सिनेमात अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकली. सध्या ती दिलजीत दोसांझसोबत ‘डिटेक्टिव्ह शेरदिल’ या सिनेमा दिसत आहे. हा सिनेमा Zee5 वर प्रसारित होत आहे. यानंतर तिचा ‘सेक्शन 84’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि निमरत कौर देखील दिसणार आहेत.