सोनाक्षीच्या लग्नात मी…, बहिणीचं मुसलमान मुलासोबत लग्न, नाराज होता भाऊ? अखेर सत्य समोर
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal: सोनाक्षीच्या लग्नात नव्हते भाऊ, मुसलमान मुलासोबत लग्न केल्यामुळे नाराज कुटुंबिय? अखेर सत्य समोर, अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला, 'सोनाक्षीच्या लग्नात मी...'

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांनी गेल्या वर्षी 23 जून रोजी ठराविक पाहुणे आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं. सोनाक्षीने मुसलमान अभिनेत्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक अफवा पसरल्या होत्या. सोनाक्षीने घेतलेल्या निर्णयामुळे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि दोन्ही भाऊ आनंदी नव्हते अशी देखील चर्चा रंगली सुरुवातीला रंगली होती. पण नंतर लग्नात शत्रुघ्न सिन्हा आनंदी आणि लेकीला आशीर्वाद देताना दिसले. तर भाऊ कुश सिन्हा बहिणीच्या लग्नाला आलाच नव्हता अशी चर्चा रंगली होती.
सोनाक्षी लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले, ज्यामध्ये कुश कुठेच दिसला नाही. शिवाय कुश याने सोशल मीडिया पोस्ट देखील केली नव्हती. यामुळे अनेक चर्चा रंगल्या. पण आता कुश त्याचा दिग्दर्शित पहिला सिनेमा ‘निकिता रॉय’ घेऊन येत आहे, ज्यामध्ये सोनाक्षी मुख्य भूमिकेत आहे.
View this post on Instagram
कुश सिन्हा याने बहिणीसोबत काम केल्यानंतर आनंद व्यक्त केला. शिवाय एक वर्षापासून सुरू असलेल्या अफवा आणि गैरसमजांनाही यामुळे पूर्णविराम मिळाला. नुकताच झालेल्या मुलाखतीत कुश म्हणाला, ‘गेल्या वर्षापासून एक गैरसमज आहे. ती माझी बहीण आहे. मी तिच्या लग्नात उपस्थित होतो. मी तिथे नव्हतो ही अफवा कोणी पसरवली हे मला माहित नाही.’
पुढे कुश म्हणाला, ‘मी माझ्या बहिणीवर प्रचंड प्रेम करतो. मी फक्त एवढंच सांगेल की फक्त अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. सोनाक्षी चांगली आहे. लुटेरा सोनाक्षीचा दुसरा का तिसरा सिनेमा आहे. ज्यामध्ये तिने चांगलं काम केलं आहे.’ असं देखील कुश म्हणाला.
सोनाक्षीसोबत का केलं काम?
यावर कुश सिन्हा म्हणाला, ‘सोनाक्षी एक अशी अभिनेत्री आहे जी प्रत्येक भूमिका प्रामाणिकपणे पार पाडते. हेच कारण आहे मी सोनाक्षीसोबत काम करत आहे.’ ‘निकिता रॉय’ सिनेमात सोनाक्षी हिच्यासोबत अभिनेता अर्जुन रामपाल देखील आहे. ‘निकिता रॉय’ सिनेमा 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्री कायम नवऱ्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नवऱ्यासोबत फोटो पोस्ट करत सोनाक्षी चाहत्यांना कपल गोल्स देत असते. सोशल मीडियावर सोनाक्षी कायम सक्रिय असते.
