प्रेग्नन्सीनंतर ती माझ्याकडे आली तेव्हा.. शिल्पा शेट्टीच्या वजनाबाबत फिटनेस ट्रेनरचा मोठा खुलासा, जॉन अब्राहमचं गुपितही सांगितलं
सेलिब्रिटी ट्रेनर विनोद चन्ना यांनी जॉन अब्राहमच्या कडक डाएट बद्दल आणि प्रेग्नन्सीनंतर शिल्पा शेट्टीच्या तीन महिन्यांतच वजन कमी करण्यामागील अनेक रहस्ये उलगडली आहेत. वजन कमी करण्यासाठी शिल्पाने सर्जरी केली होती का याबद्दल त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

मोठ्या पडद्यावर झळकणारे,., पर्फेक्ट शरीर, बॉडीसह दिसणारे बॉलिवूड स्टार्स हे त्यांच्या डाएट आणि फिटनेसबद्दल खूप सतर्क असतात. अनेक कलाकार तर असे आहेत जे अनेक वर्ष फक्त एकाच पद्धतीचं डाएट फॉलो करतात, तेही एवढं की एक वेळ अशी येते जेव्हा ते साध जेवणंही नीट पचवू शकत नाही. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांनी अलीकडेच जॉन अब्राहम (John Abraham) आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांच्या फिटनेसबद्दल काही माहिती शेअर केली. त्यांनी अनेक बॉलिवूड स्टार्सना प्रशिक्षण दिले आहे आणि सध्या ते अंबानी कुटुंबाचे ट्रेनर आहेत.
जॉनचं स्ट्रिक्ट डाएट
एका मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक स्टार्सबद्दल खुलासे केले. जॉन अब्राहम त्याच्या आहाराबाबत खूपच स्ट्रिक्ट आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्याने साखर देखील खाल्ली नाही. “जॉन खूप शिस्तप्रिय माणूस आहे. जर मी त्याला फक्त चार प्रकारचे अन्नपदार्थ खाण्यास सांगितले तर तो फक्त तेवढंच खाईल आणि इतर कोणत्याही गोष्टीला हात लावणार नाही. तो इतका कठोर आहे” असं त्यांनी नमूद केलं.
जॉनला आता भेंडी, वांग पचतच नाही
विनोद यांनी पुढे सांगितलं की, जॉन हा साखरेला हात पण लावत नाही. पण मी त्याला नेहमी सल्ला देतो की, कोणतीही गोष्ट खाणं पूर्णपणे बंद करू नकोस. कारण भविष्यात त्याने तो (बंद केलेला) पदार्थ खाल्ला तर त्याला लगेच खोकला होऊ त्रास होऊ शकतो. जॉन इतक्या दिवसांपासून डाए करतोय आहे की आता त्याला वांगी किंवा भेंडी खायला दिली तरी त्याचे पोट खराब होऊ शकते. त्याने बऱ्याच दिवसांपासून या गोष्टी खाल्लेल्या नाहीत. त्यामुळे शरीराला तशी सवय झाली आहे. म्हणूनच आता दर त्याने तो पदार्थ अचानक खाल्ला तर शरीर ते पचवू शकत नाही, असं चन्ना म्हणाले.
शिल्पाने केली सर्जरी ?
यावेळी ते अभिनेत्री शिल्पा शेट्टीबद्दलही बोलले. प्रेग्नन्सीनंतर तिने इतक्या झपाट्याने वजन कमी केलं की ते पाहून अनेक लोकांचा विश्वासच बसायचा नाही. “गरोदरपणानंतर शिल्पा शेट्टी जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा तिचे वजन 30-35 किलो वाढलं होतं. मी तिला तीन महिन्यांत सर्व वजन कमी करण्यास मदत केली आणि त्यानंतर ती नच बलिये या रिअॅलिटी शोमध्ये दिसली.” असं ते म्हणाले.
मात्र तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोकांना वाटत होतं की तिने (वजन कमी करण्यासाठी) सर्जरी करून घेतली आहे. पण आमच्या मेहनतीबद्दल कोणी बोलत नाही. अनेक लोकांना हे पटतं पण काहींना नाही. पण शिल्पाचा वेटलॉस खूप नैसर्गिक पद्धतीने झाला होता, असंही ट्रेनर विनोद चन्ना यांनी नमूद केलं.
