ईशा अंबानी यांच्या सासूबाईंबद्दल माहिती आहे? श्रीमंत उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी

जगातील 25 पॉवरफुल महिलांच्या यादीत ईशा अंबानी यांच्या सासूबाईंचं नाव..., काय काम करतात ईशा अंबानी यांच्या सासूबाई? सध्या सोशल मीडियावर ईशा यांच्या सासूबाईंचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अंबानी कुटुंबाच्या आनंदात त्यांनी हजेरी लावली...

ईशा अंबानी यांच्या सासूबाईंबद्दल माहिती आहे? श्रीमंत उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 4:01 PM

भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न असल्यामुळे सर्वत्र अंबानी कुटुंबात होणाऱ्या कर्यक्रमांची चर्चा चर्चा रंगली आहे. अनंत अंबानी हे 12 जुलै रोजी राधिका मर्चंट सोबत लग्न करणार आहेत. सध्या लग्नापूर्वीच्या विधी सुरु असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी आणि पाहुणे मंडळी हजेरी लावताना दिसत आहेत. लग्नाआधी सुरु असलेल्या विधींना मुकेश अंबानी – नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांच्या सासूबाई स्वाती पिरामल यांनी देखील हजेरी लावली होती.

सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर अनंत – राधिका यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दरम्यान, ईशा अंबानी यांच्या सासूबाई स्वाती पिरामल यांचा देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल दिसत. स्वाती पिरामल यांची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र त्यांची चर्चा रंगू लागली आहे.

सर्वत्र स्वाती पिरामल यांची चर्चा

ईशा अंबानी यांच्या सासूबाईंचं नाव स्वाती पिरामल आहे, तर सासऱ्यांचं नाव अजय पिरामल असं आहे. ईशा अंबानी यांचे सासू – सासरे देखील देशातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. अजय गोपीकिसन पिरामल हे एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि पिरामल समूहाचे अध्यक्ष आहेत.

हे सुद्धा वाचा

स्वाती पिरामल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2010 ते 2014 पर्यंत भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषद आणि पंतप्रधानांच्या व्यापार परिषदेच्या सदस्या होत्या. स्वाती पिरामल यांच्या खांद्यावर एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीच्या व्हाईस चेअरपर्सनची जबाबदारी आहे. याशिवाय त्या मुंबईतील गोपालकृष्ण पिरामल हॉस्पिटलच्या संस्थापक म्हणून देखील काम पाहातात.

स्वाती पिरामल यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं आहे. स्वाती पिरामल यांना 2015 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वाती पिरामल यांचं नाव जगातील 25 पॉवरफुल महिलांच्या यादीत 8 वेळा सामील झालं आहे.

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.