Shivrayancha Chhava | छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा’

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवरायांचा छावा’ सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा' हा सिनेमा आहे.

Shivrayancha Chhava | छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट 'शिवरायांचा छावा'
Shivrayancha ChhavaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 1:18 PM

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : फक्त तरुण पिढीच नव्हे तर सर्व वयोगटातील प्रेक्षक वर्ग सध्या ऐतिहासिक सिनेमा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सिनेमागृहाकडे वळले आहेत. त्याचं कारण म्हणजे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. ‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या भव्य ऐतिहासिक सिनेमांसाठी दिग्पाल लांजेकर ओळखले जातात. पुरस्कार विजेते दिग्पाल लांजेकर आणि ‘मल्हार पिक्चर कंपनी’ यांनी आता आणखी एका ऐतिहासिक सिनेमाची घोषणा केली आहे. ‘शिवरायांचा छावा’ या आगामी ऐतिहासिक सिनेमाचे मोशन पोस्टर त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा’ हा सिनेमा नवीन वर्षात, म्हणजेच 16 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

“छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर साकारायला मिळणं हे माझं परमभाग्यच आहे असं मी मानतो”, या शब्दांत दिग्पाल लांजेकरांनी ‘शिवरायांचा छावा’चं मोशन पोस्टर प्रदर्शित करताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या सिनेमाविषयी बोलताना ‘मल्हार पिक्चर कंपनी’ यांनी म्हटलं, “ऐतिहासिक सिनेमा बनवणं हे आमचं कायमच स्वप्नं होतं आणि त्यातही महाराष्ट्राचे लाडके युवराज छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा मांडता येणं यापेक्षा दुसरं भाग्य काय असेल. हा सिनेमा करताना घेतला गेलेला अतिशय उत्तम आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे दिग्पाल लांजेकर यांची लेखक आणि दिग्दर्शक म्हणून केलेली निवड. या ऐतिहासिक कथेच्या दिग्दर्शनासाठी त्यांच्याशिवाय दुसरं कोणतं नाव आमच्या डोक्यात आलंच नाही. त्यांचा इतिहासाचा असलेला अभ्यास आणि त्यांची अभ्यासू वृत्ती ही खरोखर वाखणण्याजोगी आहे.”

हे सुद्धा वाचा

निर्माते वैभव भोर आणि किशोर पाटकर निर्मित ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाचे सहयोगी निर्माते भावेश रजनीकांत पंचमतिया हे आहेत. तर कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी प्रखर मोदी यांनी पेलली आहे. ‘मल्हार पिक्चर कंपनी’ बॅनरच्या अंतर्गत तयार होणा-या ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र आणि मृणाल कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.