Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझचा मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट; रणवीर-दीपिका, विकी-कतरिना लावणार हजेरी?

दिलजीत दोसांझ वर्ल्ड टूरसाठी सज्ज; मुंबईतील पहिल्या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी?

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझचा मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट; रणवीर-दीपिका, विकी-कतरिना लावणार हजेरी?
Diljit DosanjhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 2:17 PM

मुंबई: प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझच्या गायकीचा देशभरात आणि परदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. याच चाहत्यांसाठी तो सध्या ‘बॉर्न टू शाइन’ या वर्ल्ड टूरवर आहे. या वर्ल्ड टूरदरम्यान तो विविध देशांमध्ये फिरून चाहत्यांसाठी म्युझिक कॉन्सर्ट करणार आहे. याची सुरुवात भारतातूनच होणार आहे. मुंबईत दिलजीतचा पहिला शो होणार आहे. विशेष म्हणजे या शोला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित राहणार आहेत. दिलजीतच्या या मुंबईतल्या शोची घोषणा होताच 70 ते 80 टक्के तिकिटांची विक्री झाली आहे.

मुंबईतल्या बीकेसी जिओ गार्डन याठिकाणी येत्या 9 डिसेंबर रोजी दिलजीत दोसांझ लाइव्ह परफॉर्म करणार आहे. ‘सा रे ग म’ यांनी या कॉन्सर्टचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने त्यानुसार पोलीस बंदोबस्तही तैनात असणार आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकारही दिलजीतच्या दमदार गायकीचे चाहते आहेत. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, कतरिना कैफ, विकी कौशल असे प्रसिद्ध सेलिब्रिटी या कॉन्सर्टला हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाचं व्यवस्थापन एमेथिस्ट करत आहेत.

एमआयपी टेबल हे अशा कार्यक्रमांमधील मुख्य आकर्षण असतात. मोठे बॉलिवूड कलाकार, व्यावसायिक आणि इतर मोठे सेलिब्रिटी हे एमआयपी टेबल बुक करतात. या तिकिटांची किंमत अत्यंत महाग असूनही दिलजीतच्या कार्यक्रमातील या खास टेबल्सची मागणीही जोरदार आहे.

याआधी दिलजीतने दोन वर्षांपूर्वी मुंबईत परफॉर्म केलं होतं. त्याच्या या कार्यक्रमाला बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा उपस्थित होती. आता कोरोना महामारीनंतर दिलजीत पहिल्यांदाच मुंबईत परफॉर्म करणार आहे.

दिलजीतने ‘इक कुडी’, ‘सौदा खरा खरा’, ‘चंदीगड मे’, ‘इश्क दी बाजियाँ’ अशी लोकप्रिय गाणी गायली आहेत. गायकासोबतच तो उत्तम अभिनेताही आहे. ‘गुड न्यूज’, ‘उडता पंजाब’, ‘जोगी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.