DDLJ 25 | ट्विटरवर पुन्हा एकदा ‘राज मल्होत्रा’ आणि ‘सिमरन’ची एंट्री, चाहते म्हणाले ‘जा सिमरन, जा.. जी ले अपनी जिंदगी’

अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल देवगण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे नाव बदलून ‘राज मल्होत्रा’ आणि ‘सिमरन’ असे केले आहे.

DDLJ 25 | ट्विटरवर पुन्हा एकदा ‘राज मल्होत्रा’ आणि ‘सिमरन’ची एंट्री, चाहते म्हणाले ‘जा सिमरन, जा.. जी ले अपनी जिंदगी’
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 12:21 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये मैलाचा टप्पा ठरलेला चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ला (Dilwale Dulhania Le Jayenge) प्रदर्शित होऊन आज (20 ऑक्टोबर) 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल देवगण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे नाव बदलून ‘राज मल्होत्रा’ आणि ‘सिमरन’ असे केले आहे. इतकेच नव्हे तर, राज आणि सिमरनचे फोटोदेखील डीपी म्हणून ठेवले आहेत. 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी या चित्रपटाच्या आठवणींना अनोख्या पद्धतीने उजाळा दिला आहे. तर, नेटकऱ्यांनीही ‘जा सिमरन, जा.. जी ले अपनी जिंदगी’ हा आयकॉनिक संवाद कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Dilwale Dulhania Le Jayenge completed 25 years : shahrukh khan and Kajol change their twitter DP name as Raj Malhotra and Simran)

शाहरुख बनला ‘राज मल्होत्रा’

काजोललाही आली ‘सिमरन’ची आठवण

चित्रपट रचणार आणखी एक इतिहास

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून अनेक विक्रम केले आहेत. आदित्य चोप्राच्या या चित्रपटाने ‘डर’ आणि ‘बाजीगर’च्या शाहरुख खानला ‘किंग ऑफ रोमान्स’ बनवले होते. तर, काजोल आणि शाहरुखची जोडी बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडी बनली होती. राज आणि सिमरनच्या या प्रेमकथेचे लोक इतके वेडे झाले की, आजही ते मुंबईतील ‘मराठा मंदिरात’ हा चित्रपट बघायला जातात. 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता आणखी एक इतिहास घडवणार आहे. चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने लंडनमध्ये शाहरुख आणि काजोल अर्थात राज आणि सिमरन यांचा कांस्य पुतळा बसवला जाणार आहे. (Dilwale Dulhania Le Jayenge completed 25 years : shahrukh khan and Kajol change their twitter DP name as Raj Malhotra and Simran)

लंडनमध्ये बॉलिवूड चित्रपटातील पात्रांचा पुतळा उभारण्याची ही पहिली वेळ आहे. ज्यामध्ये चित्रपटाचे (Dilwale Dulhania Le Jayenge) एक दृश्य रिक्रीएट केले जाणार आहे. हा पुतळा लिसेस्टर स्क्वेअरमध्ये ‘सीन इन द स्क्वेअर’ म्हणून स्थापित केला जाणार आहे. जो या चित्रपटाची आणि बॉलिवूडची लोकप्रियता जगभरात दाखवणार आहे. ‘हार्ट ऑफ लंडन बिझिनेस अलायन्स’ चे मार्क विल्यम्स यांनी ही माहिती दिली आहे.

‘डीडीएलजे’ चित्रपटाची क्रेझ

‘डीडीएलजे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) चित्रपटाची क्रेझही लोकांच्या डोक्यावरुन उतरलेली नाही. जेव्हा जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर लागतो, तेव्हा बहुतेक लोकांना चॅनेल बदलावे असे वाटतच नाही. चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित अशा बर्‍याच कथा आहेत ज्या वाचून किंवा ऐकून आजही लोक आश्चर्यचकित होतात. या चित्रपटासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. याचवेळी सप्टेंबर 1995मध्ये आमिर खानचा ‘रंगिला’ चित्रपटही प्रदर्शित झाला होता. त्यावर्षी फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये दोन्ही चित्रपटांना एकाचवेळी अनेक नामांकने मिळाली होती.

(Dilwale Dulhania Le Jayenge completed 25 years : shahrukh khan and Kajol change their twitter DP name as Raj Malhotra and Simran)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.