AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, रुग्णालयाचे हेल्थ बुलेटीन

निशिकांत कामत यांच्यावर लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे हैदराबादमधील गच्चीबोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, रुग्णालयाचे हेल्थ बुलेटीन
| Updated on: Aug 17, 2020 | 2:49 PM
Share

हैदराबाद : मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट वृत्त प्रसारित झाल्यानंतर ‘एआयजी रुग्णालया’ने हेल्थ बुलेटीन जारी केले आहे. निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. निकटवर्तीयांच्या हवाल्याने ‘टीव्ही 9 मराठी’सह देशभरातील अनेक माध्यमांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं होतं. ‘डोंबिवली फास्ट’, ‘दृश्यम’, ‘लय भारी’ यासारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे. (Director Nishikant Kamat on ventilator support continues to be critical Health Bulletin by AIG Hospital)

निशिकांत कामत यांच्यावर लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे हैदराबादमधील गच्चीबोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 50 वर्षीय निशिकांत कामत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे.

मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या निधनाचं ट्वीट केल्याने काहीसा संभ्रम पसरला होता, पण अभिनेता रितेश देशमुख याने सर्वप्रथम ट्वीट करुन या अफवांचे खंडन केले. निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून तो जिवंत आहे. त्याची जीवनमृत्यूशी झुंज सुरु असून त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती रितेश देशमुखने केली आहे.

निशिकांत कामत यांचा परिचय

निशिकांत कामत यांचा जन्म 17 जून 1970 रोजी मुंबईतील दादर भागात झाला. रुईया कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. निशिकांत कामत यांनी 2004 मध्ये ‘सातच्या आत घरात’ सिनेमातून लेखक आणि अभिनेता म्हणून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. त्याच वर्षी निशिकांत यांनी ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर त्यांनी आर माधवनसह या सिनेमाचा तामिळमध्ये रिमेक केला.

निशिकांत कामत यांनी ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’, ‘फोर्स’, ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’ यासारख्या एकापेक्षा हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय ‘सातच्या आत घरात’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘ज्युली 2’, ‘मदारी’, ‘भावेश जोशी’, फुगे, ‘डॅडी’ सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात अभिनयही केला आहे.

अजय देवगणचा ‘दृश्यम’ सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांनी दिग्दर्शन थांबवून केवळ अभिनेता म्हणूनच काम केलं. ‘दरबदर’ या आगामी सिनेमाचे ते दिग्दर्शनही करणार आहेत.

मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यानंतर निशिकांत कामत यांनी ‘दृश्यम’, ‘मदारी’, ‘फुगे’ यासारख्या सिनेमांचंही दिग्दर्शन केलं. ‘रॉकी हॅण्डसम’ या सिनेमात त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका चांगलाच भाव खाऊन गेली. (Director Nishikant Kamat on ventilator support continues to be critical Health Bulletin by AIG Hospital)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.