Disha Patani Tiger Shorff : दिशा पटानी-टायगर श्रॉफचं ब्रेकअप? सोशल मीडियावर बातम्यांचा धुमाकूळ, जॅकी श्रॉफ म्हणतात…

दादासाहेब कारंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Jul 27, 2022 | 11:08 PM

मी त्यांना एकत्र हँग आउट करताना पाहिले आहे. मी मुलांच्या प्रयव्हसीमध्ये जास्त पडत नाही, पण मला वाटते की ते चांगले मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त ते एकमेकांसोबत वेळ घालवतात, अशी पहिली प्रतिक्रिया जॅकी श्रॉफ यांनी दिली आहे.

Disha Patani Tiger Shorff : दिशा पटानी-टायगर श्रॉफचं ब्रेकअप? सोशल मीडियावर बातम्यांचा धुमाकूळ, जॅकी श्रॉफ म्हणतात...
दिशा पटानी-टायगर श्रॉफचं ब्रेकअप?
Image Credit source: insta

मुंबई : दिशा पटानीच्या (Disha Patani) दिलखेच अदांनी तिचे चाहते नेहमीच घायळ होत असतात. तर टायगर श्रॉफचीही (Tiger Shroff) मोठी क्रेझ आहे. मात्र आता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या ब्रेकअपची (Breakup) बातमी बॉलीवूडमध्ये व्हायरल होत आहे. आता दोघांचे ब्रेकअप प्रत्यक्षात झाले की नाही हे लवकरच कळलेले नाही. मात्र दिशा-टायगरच्या ब्रेकअपच्या बातमीवर जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया नक्कीच आली आहे. टायगर श्रॉफच्या यांनी मुलाच्या ब्रेकअपच्या प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, दिशा-टायगर नेहमीच मित्र होते आणि अजूनही आहेत. मी त्यांना एकत्र हँग आउट करताना पाहिले आहे. मी मुलांच्या प्रयव्हसीमध्ये जास्त पडत नाही, पण मला वाटते की ते चांगले मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त ते एकमेकांसोबत वेळ घालवतात, अशी पहिली प्रतिक्रिया जॅकी श्रॉफ यांनी दिली आहे.

त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे

याबाबत आणखी बोलतना जॅकी यांनी सांगितले की हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे. त्यांनी स्वतःच याबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यांना एकत्र रहायचे आहे की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. ते एकमेकांशी सुसंगत आहेत की नाही? ही त्यांची प्रेमकहाणी आहे. माझी आणि माझ्या पत्नीसारखी आमची स्वतःची प्रेमकहाणी आहे. दिशासोबत आमचे चांगले ट्युनिंग आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा ते बोलतात तेव्हा ते आनंदी दिसतात.

या लव्ह स्टोरीचा सस्पेन्स वाढला

दिशाचे टायगरच्या कुटुंबाशी, विशेषत: त्याची आई आणि बहिणीशी दिशाचे चांगले संबंध आहेत. दिशा आणि टायगर गेल्या 6 वर्षांपासून डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या 1 वर्षापासून त्यांच्यात काही चांगले चालत नव्हते अशाही बातम्या माध्यमांमध्ये आल्या आहेत. त्यामुळे अखेर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअप दरम्यान टायगर आणि दिशा त्यांच्या कामावर चांगले लक्ष केंद्रित करत आहेत. आता ते एकत्र नाहीत की आहेत हे त्यांनी माध्यमांना किंवा फॅन्सला कळू दिले नाही, अशाही चर्चा सध्या सुरू आहेत.

दिशा आणि टायगर ही गाजलेली जोडी

दिशा पटनीची करोडो चाहते आहेत. तिने अनेक मोठ्या चित्रपटात काम केलं आहे. तसेच मॉडलिंगमध्येही ती सध्या चांगलीच एक्टिव्ह आहे. तसेच टायगर श्रॉफच्या नावावरही अनेक हीट चित्रपट आहेत. त्याचीही फॅन फोलोविंग मोठी आहे. अशातच त्यांच्या ब्रेकपच्या बातम्या आल्याने नेमकं काय चाललंय याची उत्सुक्ता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI