AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जान्हवी कपूर घाबरलेल्या अवस्थेत कोणावर भडकली? म्हणाली, ‘वाईट प्रकारे कोणी…’

Janhvi Kapoor | भडलेल्या जान्हवी कपूर हिने कोणाला सुनावलं? सोशल मीडियावर अभिनेत्री व्हिडीओ तुफान व्हायरल... चाहत्यांसोबत सेल्फी घेतल्यानंतर जान्हवी कोणाला संतापात म्हणाली, 'वाईट प्रकारे कोणी...', सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा...

जान्हवी कपूर घाबरलेल्या अवस्थेत कोणावर भडकली? म्हणाली, 'वाईट प्रकारे कोणी...'
| Updated on: May 11, 2024 | 9:37 AM
Share

अभिनेत्री जान्हवी कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. जान्हवी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. जान्हवी हिने लूक्स, सौंदर्य, फॅशन आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. आता जान्हवी लवकरच ‘मिस्टर एंड मिसेज माही’ सिनेमात अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत दिसणार आहे. नुकताच एका कार्यक्रमात जान्हवी कपूर हिला स्पॉट करण्यात आलं. तेव्हा जान्हवी घबरलेल्या अवस्थेत पापाराझींवर संतापताना दिसली.

जान्हवी कपूर हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या जान्हवी ‘मिस्टर एंड मिसेज माही’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. व्हिडीओमध्ये जान्हवी लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्री चाहत्यांसोबत सेल्फी देखील घेताना दिसत आहे.

पण जान्हवी जेव्हा पापाराझींना पाहते तेव्हा म्हणते, ‘वाईट प्रकारे कोणीही फोटो काढू नका…’ सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, याआधी देखील अनेक अभिनेत्रींचे नको त्या प्रकारे फोटो काढत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामुळे जान्हवी हिने यावेळी पापाराझींना खडसावून सांगितलं आहे.

सांगायचं झालं तर, जान्हवी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आहे. जान्हवी हिच्या कुटुंबियांनी देखील शिखर याची स्वीकार केला आहे.

नुकताच, जान्हवी हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या नेकलेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्रीने शिखू नावाचं पेंडेंट घातलं होतं. ज्यामुळे शिखर आणि जान्हवी यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्री अधिकृत वक्तव्य केलं नाही.

रिपोर्टनुसार, बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये शिखर याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुल दिली होती. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.