
Shilpa Shetty – Raj Kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत मोठी झाल्याची माहिती समोर येत आहे. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात शिल्पा आणि राज पोलिसांच्या कचाट्यात अडकले आहे. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्रीची चौकशी केली.शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. याआधी राज कुंद्रा यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 4.30 तास दोघांची चौकशी करण्यात आली.
रिपोर्ट्सनुसार, शिल्पाचा पती राज कुंद्रा याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, फसवणुकीची तक्रार दाखल करणारे दीपक कोठारी यांनी एका एनबीएफसीकडून 60 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यानंतर कोठारीच्या कंपनीत हे इक्विटी म्हणून समायोजित करण्यात आलं. या रकमेपैकी 20 कोटी रुपये सेलिब्रिटी प्रमोशन, ब्रॉडकास्टआणि इतर खर्चासाठी वापरले गेले. बिपाशा बासू आणि नेहा धुपिया यांना देखील यासाठी पैसे देण्यात आले. राज याने पोलिसांना प्रमोशनचे फोटो दाखवल्याची माहिती देखील समोर येत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपनीची सध्या चौकशी सुरु आहे, त्या कंपनीची शिल्पा मोठी शेअर होल्डर आहे. त्यामुळे अभिनेत्रीची देखील चौकशी सुरु आहे. पुरावे समोर आल्यानंतर एक मोठी गोष्ट देखील समोर येत आहे आणि ती म्हणजे, शेअर होल्डर असून देखील शिल्पाने सेलिब्रिटी फी घेतली आहे. ज्याला खर्चात दाखवण्यात आलं आहे. जे निधीचा गैरवापर दर्शवते.
आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट 2025 मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर 60.4 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप दाखल केले. सप्टेंबर महिन्यात त्यांच्या विरोधात लूकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली. यूवाय इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक दीपक कोठारी यांनी तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये राज आणि शिल्पाने 2015 ते 2023 दरम्यान त्यांना व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.