Shocking : हिंदी मालिकांसाठी वाईट बातमी, तब्बल 8 मोठ्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार

छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणारे एक, दोन नव्हे तब्बल 8 मोठे शो ऑफ एअर होणार आहे. (Eight Hindi Popular TV Shows Going To Off Air)

Shocking : हिंदी मालिकांसाठी वाईट बातमी, तब्बल 8 मोठ्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार
Namrata Patil

|

Jan 27, 2021 | 11:35 PM

मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात हिंदी मालिकांच्या प्रेक्षकांसाठी वाईट बातमी आहे. कारण छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणारे एक, दोन नव्हे तर तब्बल 8 मोठे शो ऑफ एअर होणार आहे. यातील दोन शो आधीच बंद झाले आहेत. विशेष म्हणजे ज्या मालिका बंद होत आहेत त्यांची गोष्ट ही फार छान होती. मात्र या मालिका प्रेक्षकांनी फार पसंती दिली नाही. तसेच रेटींगमध्ये या मालिकांनी काही उल्लेखनीय कामगिरी केली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव या मालिका बंद कराव्या लागत आहे. (Eight Hindi Popular TV Shows Going To Off Air)

तारे जमीन पर

स्टार प्लसवरील तारे जमीन पर ही मालिका आता बंद होणार आहे. या रिअॅलिटी शोमध्ये शंकर महादेवन, टोनी कक्कड आणि जोनिता गांधी यासारखे दिग्गज परीक्षक होते. मात्र ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

द कपिल शर्मा शो

द कपिल शर्मा शो लवकरच ऑफ एअर होणार आहे. कपिलच्या शोमध्ये सलमान खान ते अक्षय कुमार यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले आहेत. अशा परिस्थितीत शो बंद होणार म्हटल्यावर चाहते निराश झाले आहेत. मात्र काही महिन्यानंतर पुन्हा या शो चे दुसरा भाग प्रसारित केला जाणार आहे.

कौन बनेगा करोड़पती

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी कौन बनेगा करोड़पती ही मालिका सुरु करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. कौन बनेगा करोड़पती या मालिकेचा 12 वा सीझन फार चढउतार आले. तसेच यात पहिल्यांदाच सर्व महिलाच करोडपती बनल्या.

नागिन 5

नागिन 5 ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सहा महिन्यानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 5 फेब्रुवारीला ही मालिका बंद होणार आहे. (Eight Hindi Popular TV Shows Going To Off Air)

अलादीन – नाम तो सुना होगा

छोट्या पडद्यावरील अलादीन – नाम तो सुना होगा ही मालिका गेल्या अडीच वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. मात्र ही मालिका आता ऑफ एअर होणार आहे. या मालिकेतील मुख्य अभिनेता असलेला सिद्धार्थ निगम याने याची माहिती दिली आहे.

गुप्ता ब्रदर्स

स्टार भारत या चॅनलवर गुप्ता ब्रदर्स ही मालिका प्रदर्शित होत होती. मात्र या मालिकेचे रेटींग घसरल्याने ही मालिका बंद होणार आहे. एका रात्रीत ही मालिका बंद करण्याची घोषणा करण्यात आली.

Excuse Me Madam

Excuse Me Madam ही मालिका गेल्या 10 डिसेंबरला बंद करण्यात आली होती. या मालिकेतील राजेश कुमार आणि नायरा बॅनर्जी हे लोकांच्या पसंतीस उतरले होते. (Eight Hindi Popular TV Shows Going To Off Air)

लॉकडाऊन की लव स्टोरी

कुल्फीकुमार बाजेवाला या मालिकेतील मोहित मलिक आणि दिव्यदृष्टीतील सना सय्यद या दोन कलाकारांसोबत लॉकडाऊन की लव स्टोरी ही मालिका सुरु करण्यात आली होती. मात्र ही मालिका आता बंद करण्यात आली आहे. गेल्या 23 जानेवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला.

(Eight Hindi Popular TV Shows Going To Off Air)

संबंधित बातम्या : 

‘गुम हैं किसी के प्यार में’ मालिकेतील नील ऐश्वर्याचं जमलं!, रोका सेरेमनीचे खास फोटो शेअर

नेपोटीझमच्या टीकेची भीती, बॉलिवूड एंट्रीपूर्वीच खुशी कपूर ‘अभिनय शाळेत’ दाखल!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें