हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, इतकं सुंदर की 41 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट

इतकं सुंदर गाणं की एक-दोन वेळा नाही तर 100 वेळा ऐकलं तरी लोकांचं भरत नाही मनं. गेल्या 41 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय. थिएटरमध्ये प्रत्येक प्रेक्षकांच्या डोळ्यात होते पाणी. आजही ते गाणं प्रचंड ऐकतात लोक.

हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, इतकं सुंदर की 41 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 14, 2026 | 1:18 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपट त्यांच्या कथेसोबतच गाण्यांसाठीही कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. 1985 मध्ये प्रदर्शित झालेला राज कपूर यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ हा त्यापैकीच एक. या चित्रपटातील ‘एक राधा, एक मीरा’ हे गाणे तब्बल 7 मिनिटे 55 सेकंदांचे असून 41 वर्षांनंतरही जुन्या हिंदी चित्रपटसंगीतातील लोकप्रिय गाण्यांमध्ये त्याचा समावेश होतो.

हे गाणं लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले असून, गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन यांनी त्याचे बोल लिहून संगीतबद्ध केले होते. विशेष म्हणजे, या गाण्यानेच राज कपूर यांना ‘राम तेरी गंगा मैली’च्या कथेची कल्पना सुचली होती.

एका भजनातून सुचली चित्रपटाची कथा

‘एक राधा, एक मीरा’ हे भजन रवींद्र जैन एका कार्यक्रमात सादर करत होते. त्यावेळी राज कपूर यांनी हे भजन ऐकले आणि ते रवींद्र जैन यांच्या संगीताने अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुढील आर. के. बॅनरच्या चित्रपटासाठी रवींद्र जैन यांची संगीतकार म्हणून निवड करण्याचे ठरवले. याच भजनातून त्यांना चित्रपटाच्या कथानकाची कल्पना सुचल्याचे सांगितले जाते.

‘राम तेरी गंगा मैली’मध्ये राजीव कपूर यांनी नरेनची भूमिका साकारली होती. नरेनच्या आयुष्यात गंगा आणि राधा अशा दोन स्त्रिया येतात. गंगा ही त्याची पत्नी असते तर कुटुंबाच्या इच्छेनुसार राधासोबत त्याचे लग्न ठरवले जाते. गंगा मृत झाल्याचे समजल्याने नरेनच्या आयुष्यात मोठा पेच निर्माण होतो.

लता मंगेशकरांच्या आवाजाने गाणं झालं अजरामर

‘एक राधा, एक मीरा’ या गाण्याला लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे एक वेगळीच उंची मिळाली. रवींद्र जैन यांच्या भावपूर्ण शब्दांना आणि संगीताला लतादीदींच्या आवाजाची साथ लाभल्याने हे गाणं आजही श्रोत्यांच्या मनात घर करून आहे.

‘राम तेरी गंगा मैली’ला प्रदर्शित होऊन 41 वर्षे झाली असली तरी ‘एक राधा, एक मीरा’ची लोकप्रियता कमी झालेली नाही. प्रेम, भक्ती आणि विरहाच्या भावनांचा सुंदर संगम असलेले हे गाणं आजही जुन्या हिंदी चित्रपटसंगीताच्या चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय ठेवा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us