लग्नाआधी दिला मुलाला जन्म, आता अविवाहित टीव्ही क्वीन दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या तयारीत?
अविवाहित टीव्ही क्वीन दुसऱ्या बाळाला जन्म देण्याच्या विचारात? पहिला मुलगा आहे 5 वर्षांचा... सध्या सर्वत्र सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्याची चर्चा... ती कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

झगमगत्या विश्वात सेलिब्रिटींच्या कामाची नाहीतर, त्यांच्या खआसगी आयुष्याची चर्चा तुफान रंगलेली असते. सेलिब्रिटींचं कोणासोबत अफेअर आहे. एवढंच नाहीतर, झगमगत्या विश्वात असे देखील सेलिब्रिटी महिला आहेत, ज्यांना लग्नाआधी आई होण्याचा निर्णय घेतला. अशाच सेलिब्रिटी महिलांपैकी एक म्हणजे टीव्ही क्वीन एकता कपूर… एकता कपूर हिने लग्न न करता सरोगेसीच्या मदतीने मुलाला जन्म दिला. एकता कपूर हिच्या मुलाचं नाव रवी कपूर असं आहे.
सांगायचं झालं तर, मुलगा रवी यांच्या जन्मानंतर माझ्या जगण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे… असं देखील एकता कपूर अनेकदा म्हटली आहे. दरम्यान, एकता कपूर पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. रवी याला भाऊ किंवा बहिणीची गरज असल्यामुळे एकता हिने पून्हा आई होण्याचा निर्णय घेतला आहे… अशा चर्चा रंगल्या आहेत. अशात टीव्ही क्वीन दुसऱ्यांदा आई होण्याचा विचार करत आहे का? अशा चर्चा रंगल्या आहेत.
एका रिपोर्टनुसार, एकता कपूर पुन्हा एकदा आई होण्याचा विचार करत आहे आणि यावेळीही पुन्हा तिने सरोगसीवर विश्वास व्यक्त केला आहे. पण कपूर कुटुंबातील एका खास सूत्राने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम देत, सत्य काय आहे, हे सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एकता कपूर हिची चर्चा रंगली आहे.
कपूर कुटुंबातील एका खास सूत्राने रंगणाऱ्या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं आहे. एक्सक्लूसिव आर्टिकल्सला एक क्लिक मिळवण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जातात. हे बिलकूल योग्य नाही. असं सूत्रांचं म्हणणं आहे. यावरून स्पष्ट होत आहे की एकता कपूर दुसऱ्या बाळाचा विचार करत नाही…
एकता कपूर हिच्या मुलाबद्दल सांगायचं झालं तर, एकती हिने 26 जानेवारी 2024 रोजी मुलगा रवी याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. रवी याच्या वाढदिवसासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. एकता कपूर फक्त उत्तम निर्माती आणि दिग्दर्शक नाहीतर, उत्तम आई देखील आहे.
एकता कपूर हिने अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालिका विश्वात एकता कपूर हे नाव अव्वल स्थानी आहे. एकता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
