Ekta Kapoor: एकता कपूरला होणार अटक? अरेस्ट वॉरंटबद्दल वकिलाचं स्पष्टीकरण

| Updated on: Oct 02, 2022 | 9:19 PM

एकता कपूरविरोधात अटक वॉरंट जारी? नेमकं काय आहे सत्य?

Ekta Kapoor: एकता कपूरला होणार अटक? अरेस्ट वॉरंटबद्दल वकिलाचं स्पष्टीकरण
Ekta Kapoor
Image Credit source: Twitter
Follow us on

प्रसिद्ध निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. बिहारच्या बेगुसराय इथल्या न्यायालयाने एकता कपूरच्या XXX या वेब सीरिजविरोधात अटक वॉरंट जारी केल्याचं म्हटलं जात होतं. या सीरिजमध्ये एकताने सैनिकांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह चित्रीकरण दाखवल्याचा आरोप आहे. याविरोधात बेगुसराय न्यायिक दंडाधिकारी विकास कुमार यांनी वॉरंट जारी केला होता. आता याप्रकरणी एकताच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

एकता आणि तिची आई शोभा यांच्याविरोधातील सर्व आरोप वकिलाने फेटाळले आहेत. “एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मात्र या वृत्तात कोणतंच तथ्य नाही. कारण एकता आणि शोभा यांना कोणतंही अटक वॉरंट मिळालेलं नाही”, असं वकिलांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

एकता कपूरच्या ‘ट्रिपल एक्स 2’ या सीरिजमधील आक्षेपार्ह चित्रणावरून हा वाद सुरू आहे. या सीरिजमध्ये दोन सैनिकांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह सीन्स दाखवण्यात आले आहेत. देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर जातात, तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवतात, असं चित्रण या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. यावरच नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

6 जून 2020 रोजी माजी सैनिक शंभू कुमार यांच्या वतीने सीजीएम कोर्टात एक पत्र दाखल करण्यात आलं होतं. इतरही काही सैनिकांनी एकता कपूरच्या या सीरिजविरोधात आक्षेप नोंदवला होता. या वेब सीरिजमध्ये समाजात चुकीचा संदेश पसरवला जात असल्याचा, त्याचप्रमाणे सैनिकांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप करण्यात आला होता.