AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इमरान हाश्मीचा ‘विचित्र’ डाएट; 2 वर्षांपासून दररोज खातोय एकाच प्रकारचं अन्न, बायकोही वैतागली…

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी पन्नाशीत पोहोचला आहे पण त्याचा फिटनेस पाहून अजिबातच त्याचा वयाचा अंदाज येत नाही. तो आजही तेवढाच फिट अन् तरुण दिसतो. त्याचे फिटनेसचे आणि त्याच्या या तरुणपणाचे गुपित नेमकं काय आहे हे त्यानेच एका मुलाखतीत सांगितले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो दररोज एकच अन्न खात आहे. त्याचा हा डाएट थोडा विचित्र असला तरी त्याने नक्कीच त्याला फायदा दिल्याचं इमरानने सांगितले आहे.

इमरान हाश्मीचा 'विचित्र' डाएट; 2 वर्षांपासून दररोज खातोय एकाच प्रकारचं अन्न, बायकोही वैतागली...
Emraan Hashmi DietImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 15, 2025 | 6:57 PM
Share

‘अख्खा बॉलिवूड एक तरफ और इमरान हाश्मी एक तरफ’ हा डायलॉग चाहत्यांचा आता फेव्हरेट झाला आहे. कारण प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे.इमरान हाश्मीचे चित्रपट, गाणी म्हणजे प्रेक्षकांसाठी एक वेगळंच जग आहे. इमरान हाश्मी 46 वर्षांचा आहे. त्याचं चाहत्यांच्या मनातलं क्रेझ आणि त्याच्या फिटनेस अजूनही कायम आहे. त्याने एका मुलाखती त्याच्या फिटनेसचे गुपित सांगितलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो एक खास डाएट फॉलो करतोय. ज्यामुळे त्याच्या आयुष्यात खूप फरक पडल्याचं त्याने म्हटलं.

इमरानकडे पाहून त्याचा वयाचा अंदाज येत नाही

इमरान हाश्मीचा नुकताच ‘हक’ चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात त्याचे व्यक्तिमत्त्व खूपच डॅशिंग आणि आकर्षित दाखवण्यात आले आहे. पण इमरान हाश्मी अजिबात 46 वर्षांचा वाटत नसल्याचे त्याचे चाहतेही म्हणतात. त्याकडे पाहून सध्याचं त्याचं वय सांगणे खरंच कठीण आहे. या वयातही तो खूपच तंदुरुस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, इमरानने मुलाखतींमध्ये त्याच्या डाएटबद्दल सांगितले. ज्यामुळे त्याची फिटनेस आजही इतकी उत्तम. तथापि, त्याने फिटनेस व्यावसायिक आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा डाएट प्लॅन केला होता. पण गेल्या दोन वर्षापासून इमरान हा एकच डाएट फॉलो करत आहे.

इमरान हाश्मी दिवसातून कितीवेळा जेवतो?

त्याच्या या विचित्र डाएटबद्दल सांगताना इमरान म्हणाला, “मी दिवसातून फक्त दोन वेळाच खातो आणि वर्षभर मी तेच खात आहे. हो, ते कंटाळवाणे आहे, पण माझ्यासाठी ते सर्वात सोपे आहे. मी चिकन मिन्स खातो कारण ते पचायला सोपे आहे. मी संपूर्ण चिकन खाऊ शकत नाही, म्हणून मी फक्त मिन्स, सॅलड आणि गोड बटाटे खातो. माझी बायको म्हणते की मी रोज तेच अन्न कसे खाऊ शकतो. आणि तिला त्याचा कंटाळा येतो. पण मला माहितीये की प्रत्येकासाठी अन्नाचा अर्थ वेगवेगळा असतो. माझ्यासाठी तो महत्त्वाचा आहे”

दोन वर्षांपासून एकच आहार 

इमरान पुढे म्हणाला “मी गेल्या दोन वर्षांपासून हा आहार पाळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात फक्त चिकन मिन्स, सॅलड आणि गोड बटाटेच खात आहे. सॅलडमध्ये अ‍ॅव्होकॅडो, ब्रुसेल्स स्प्राउट्स, लेट्यूस, रॉकेट लीफ आणि थोडेसे बाल्सॅमिक व्हिनेगर असते. मॅश केलेले गोड बटाटे (रताळे) खातो.”

जिममध्ये व्यायाम करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ

इमरान त्याच्या इंस्टाग्रामवर जिममध्ये व्यायाम करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील नेहमीच पोस्ट करत असतो. बहुतेक व्हिडिओंमध्ये तो वेट ट्रेनिंग करताना दिसतो, ज्यावरून असे दिसून येते की इमरान वेट ट्रेनिंगवर जास्त लक्ष केंद्रित करतो. तेही त्याचा योग्य तो आहार सांभाळून. म्हणूनच पन्नाशीच्या जवळ असतानाही इमरानचा फिटनेस अन् आकर्षक लूक तसाच टिकून आहे.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.