Marathi Serial : स्टार प्रवाहवर मनोरंजनाची मेजवानी, ‘स्वाभिमान’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवीन प्रयोग करणाऱ्या स्टार प्रवाहवर लवकरच एक दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Entertainment feast on Star Pravah, 'Swabhiman' serial to hit the screen soon)

  • Updated On - 3:55 pm, Sat, 6 February 21
Marathi Serial : स्टार प्रवाहवर मनोरंजनाची मेजवानी, ‘स्वाभिमान’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवीन प्रयोग करणाऱ्या स्टार प्रवाहवर लवकरच एक दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘स्वाभिमान’. अस्तित्वाचा शोध घेऊ पाहाणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची ही गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. एका छोट्या गावात लहानाची मोठी झालेल्या पल्लवीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे. स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येय कश्या पद्धतीनं गाठते याची ही रंजक गोष्ट स्वाभिमान मालिकेतून उलगडणार आहे. पूजा बिरारी ही गुणी अभिनेत्री पल्लवी ही व्यक्तिरेखा साकारत असून स्वाभिमान या मालिकेतून ती टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहे. यासोबतच सर्वांचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी, आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेत झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्वाभिमान मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले,  ‘स्वाभिमान हा एका मुलीच्या, बाईच्या आयुष्यातला दागिना आहे जो तिनं अभिमानानं मिरवायला हवा. स्वाभिमान हे तिचं अस्तित्व आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते कधीही हरवता कामा नये, हे या मालिकेतून रसिकांना पाहायला मिळणार आहे. माणसानं स्वाभिमानी असावं ती त्याची ओळख असते.’

स्टार प्रवाह प्रस्तुत ‘स्वाभिमान’ या मालिकेची निर्मिती फ्रेम्स प्रोडक्शननं केली असून कल्पेश कुंभार दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. ‘स्वाभिमान’ ही नवी मालिका 22 फेब्रुवारीपासून स्टार प्रवाहवर प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Marathi Movie : ‘प्रीतम’ या चित्रपटात दिसणार उपेंद्र लिमये यांचं नवं रुप

Marathi Serial : मनोरंजनाची मेजवानी, तुमच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड्स

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI