Marathi Serial : मनोरंजनाची मेजवानी, तुमच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड्स

7 फेब्रुवारीला ‘होम मिनिस्टर’, ‘कारभारी लयभारी’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांचे 1 तासाचे विशेष भाग प्रदर्शित होणार आहेत.(Entertainment feast, Maha episodes of your favorite serials)

  • Updated On - 2:16 pm, Fri, 5 February 21
Marathi Serial : मनोरंजनाची मेजवानी, तुमच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड्स

मुंबई: सध्या आपल्या सर्वांनाच मालिका आवडायला लागल्या आहेत. त्यात आता आपल्या आवडत्या मालिकांचे नवनवीन भाग आपल्या भेटीला येत आहेत. कोरोनानंतर मालिकांचं शुटिंग आता पूर्वपदावर आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता नवनवीन ट्विस्ट देत मालिका आणि त्यांच्या कथा फुलत जात आहेत. येत्या रविवारी म्हणजेच 7 फेब्रुवारीला झी मराठीवर ‘होम मिनिस्टर’, ‘कारभारी लयभारी’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांचे 1 तासाचे विशेष भाग प्रदर्शित होणार आहेत.

‘होम मिनिस्टर’ या मालिकेत या भागात स्पेशल गेस्ट येणार आहेत. हा विशेष भाग ‘माझा होशील ना’ लग्नविशेष म्हणून साजरा होणार आहे, महत्वाचं म्हणजे या भागात सई आदित्यचं केळवण आणि मामांची धमाल पाहायला मिळणार आहे, सहसा लग्नांमध्ये सासवा मिरवत असतात पण सई-आदित्यच्या लग्नात उलट होणार आहे. या लग्नात चक्क सई-आदित्यचे मामा मिरवणार आहेत. तर मग आता सईला पैठणी कोण मिळवून देणार सासरचे की माहेरचे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तर ‘कारभारी लयभारी’ मालिकेत राजवीर आणि प्रियांका यांची आता मैत्री झालीय, राजवीरला प्रियांकाच्या वागण्याबोलण्यातून आपण तिला आवडत असल्याचं कळायला लागलं आहे. खूप प्रयत्नांनी तो प्रियांकाला प्रपोज करतो आता ह्यावर प्रियंकाचं उत्तर काय असेल, ती सुद्धा या प्रेमाला होकार देईल? की आपले वडील अंकुशराव पाटील ह्यांना घाबरून राजवीरला कायमचं विसरेल? याची उत्तरं मिळतील ‘कारभारी लयभारी’ या मालिकेच्या एका तासाच्या विशेष भागामध्ये.

तर कुटुंबाच्या प्रेमाखातर राधिका करणार का आपल्या तत्त्वांचा त्याग? हे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या विशेष भागात पाहायला मिळणार आहे.

त्यामुळे हे स्पेशल भाग तुमच्यासाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. पाहायला विसरू नका मनोरंजनाची ही धमाल येत्या रविवारी म्हणजेच 7 फेब्रुवारीला होम मिनिस्टर दुपारी 12 आणि संध्या.7 वा., कारभारी लयभारी दुपारी 1 आणि रात्री 8 वा., आणि माझ्या नवऱ्याची बायको दुपारी 2 आणि रात्री 9 वाजता झी मराठीवर.

संबंधित बातम्या 

राज्य शासनाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार विदुषी डॉ. एन. राजम यांना जाहीर

Marathi Serial : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत बहरलं गौरी-जयदीपचं नातं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI