महिलांना कायम पुरुषांची गरज भासते, कारण…, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचं लक्षवेधी वक्तव्य

Love Life : लग्नाआधी दिला मुलीला जन्म, वाईट दिवसांमध्ये सोडली बॉयफ्रेंडने सोडली साथ, अनेक संकटांचा सामना केलेली अभिनेत्री म्हणते, 'महिलांना कायम पुरुषांची गरज असते, कारण...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा

महिलांना कायम पुरुषांची गरज भासते, कारण..., प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचं लक्षवेधी वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 3:27 PM

मुंबई | 18 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अविवाहित आहेत. काही अभिनेत्रीच्या पतीनेसाथ सोडली, तर काही अभिनेत्रींनी लग्न करण्याला अधिक महत्त्व दिलंच नाही. बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अशा देखील आहेत, ज्यांनी लग्नाआधी आई होण्याचा निर्णय घेतला. पण बॉयफ्रेंडने कधीच शेवटपर्यंत अभिनेत्रींना साथ दिली नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता. नीना गुप्ता यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नीना गुप्ता कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगत असतात. एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी ‘महिलांना पुरुषांची कायम गरज भासते…’ असं वक्तव्य करत स्त्री – पुरुष समानतेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

नीना गुप्ता म्हणाल्या, ‘स्त्री – पुरुष समानता मी मानत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीवादासारख्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. महिलांनी सर्वप्रथम स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या महिला संपूर्ण घर सांभाळतात अर्थात गृहिणींनी स्वतःला कमी समजण्याचं कारण नाही. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे स्त्री – पुरुष समान नाहीत…’

‘ज्या दिवशी पुरुष देखील मुलांना जन्म देऊ शकतील तेव्हा स्त्री – पुरुष समानतेला माझा पाठिंबा असेल.’ पुढे महिलांच्या आयुष्यात पुरुषांचं असलेलं महत्त्व पटवून देत नीना गुप्ता म्हणाल्या, ‘एकदा मला बाहेर जायचं होतं, तेव्हा माझा कोणी बॉयफ्रेंड नव्हता. फ्लाईटसाठी जेव्हा पहाटे 4 वाजता घरातून निघाली तेव्हा पूर्ण अंधार होता.. एक माणून माझा पाठलाग करु लागला. तेव्हा घाबरलेल्या अवस्थेत मी घरी गेली.’

हे सुद्धा वाचा

‘धक्कादायक घटनेनंतर घडलेल्या घटनेनंतर मी दुसऱ्या दिवसासाठी तिकिट बूक केलं आणि एका मित्राच्या घरी थांबली. मित्र मला विमानतळापर्यंत सोडण्यासाठी आला. त्या घटनेनंतर मला माझ्या आयुष्यातील पुरुषाचं असलेलं महत्त्व कळलं. पण आता मला आता स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे. ज्यामुळे मला कोणाची गरज भासणार नाही.’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या होत्या.

नीना गुप्ता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नीना यांनी लग्नाआधी लेक मसाबा गुप्ता हिला जन्म दिला. ज्यामुळे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. आज नीना गुप्ता यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. वयाच्या 63 व्या वर्षी देखील नीना गुप्ता यांचं सौंदर्य एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लाजवेल असं आहे. सोशल मीडियावर नीना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.