AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येकाला माझ्यासोबत झोपायचं होतं आणि…, वैतागून बॉलिवूड सोडलेल्या गायिकेची व्यथा, अखेर अध्यात्माशी जोडलं नातं

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी करियरच्या उच्च शिखरावर असताना बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. अशीच एक गायिका देखील आहे, जिने सतत होणाऱ्या शारीरिक संबंधांच्या मागण्यांना कंटाळून बॉलिवूडचा निरोप घेतला आणि अध्यात्माशी नातं जोडलं...

प्रत्येकाला माझ्यासोबत झोपायचं होतं आणि..., वैतागून बॉलिवूड सोडलेल्या गायिकेची व्यथा, अखेर अध्यात्माशी जोडलं नातं
Hema Sardesai
| Updated on: Jul 27, 2026 | 10:44 AM
Share

बॉलिवूडमध्ये सक्रिय असणाऱ्या महिला कलाकार कायम त्यांना आलेल्या वाईट अनुभवांबद्दल बोलताना दिसतात. पण काही अशा देखील महिला आहे ज्यांनी सततच्या होणाऱ्या नको त्या मागण्यांना कंटाळून झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. असंच काही बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गायिकेसोबत देखील झालं आहे. बादल पे पांव है, है जवानी तो ईश्क होना है, आवारा भंवरे… यांसारख्या लोकप्रिय गाण्यांना आवाज देणाऱ्या गायिका हेमा सरदेसाई यांच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. हेमा यांनी खुलासा केला आहे की, ‘फक्त अभिनेत्रींनाच नाही तर, गायिका देखील कास्टिंग काऊच शिकार होतात…’, याच कारणामुळे हेमा यांनी इंडस्ट्रीचा निरोप घेतला आहे.

कास्टिंग काउचवर हेमा यांचा खुलासा…

सुरुवातीला हेमा यांनी कास्टिंग काऊचवर बोलणं टाळलं. यावर बोलणं योग्य नाही असं म्हणत हेमा म्हणाल्या, ‘कास्टिंग काउचबद्दल बोलणं योग्य नाही, कारण ही काही चांगली गोष्ट नाही. कोणी शारीरिक संबंधांची मागणी केली की, मी थेट नकार द्यायची. ते म्हणायचे, तुला गाणं मिळणार नाही… यावर माझं उत्तर असायचं, संगित विश्वात फक्त दिग्दर्शकच नसतात, तुम्हाला गाणी देणारे अन्य लोकं देखील असतात… मला असं वाटतं की प्रत्येकाचे कर्म असतात आणि माझं असं होतं की, मी थेट तेथून निघून जायची…’

हेमा पुढे असं देखील म्हणाल्या की, ‘अनेक प्रकरणांमध्ये असं देखील सांगितलं जातं की, त्याने फक्त माझा उपयोग केला. पण या गोष्टी महिला आणि पुरुष दोघांच्या सहमतीने होतात. जेव्हा तुम्ही परवानगी देतात, तेव्हा तुम्ही स्वतः तुमचा उपयोग होऊ देता…. हे देखील तितकंच वाईट आहे, जितकं मोलेस्टर आणि रेपिस्ट म्हणणं आहे…’

‘मी देखील एक पोस्ट लिहिलेली आणि मोठ्या समजदारीने ती पोस्ट लिहिली होती, मी कधीच त्या पुरुषासा क्लिन चिट दिली नसती. पण तो मोलेस्टर किंवा रेपिस्ट देखील नव्हता… ते तुमच्यापुढे प्रस्ताव ठेवतात, अशात ते मान्य करायचं की नाही हे तुमच्यावर आहे. कारण कोणाीच कोणावर दबाव टाकत नाही. जे काही होतं, ते तुमच्या इच्छेने होतं. जर असं काही घडलं तरी, त्याची शिक्षा त्या संबंधित पुरुषाला मिळाली आहे.’

एवढंच नाही तर, हेमा यांनी इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केला. पण कोणाचं नाव घेतलं नाही. यावर हेमा म्हणाल्या, ‘जर तुम्ही थेट नाव घेत असाल तर, ती तुमची जबाबदारी असते… पण हा पुरुष तोच आहे, ज्यावर मीटू दरम्यान आरोप करण्यात आलेले. पण तो मोलेस्टर किंवा रेपिस्ट नाही…’, असं देखील नेहा म्हणाल्या. सांगायचं झालं तर, मीटू दरम्यान बॉलिवूडच्या अनेक पुरुष सेलिब्रिटींवर गंभीर आरोप करण्यात आलेले. हेमा यांनी आता ग्लॅमरच्या जगाचा निरोप घेतला असून त्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या शिक्षिका बनल्या आहेत; श्री श्री रविशंकर यांच्यामुळेच त्या हे कार्य करत आहेत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार