'द कपिल शर्मा शो'मध्ये सिद्धूचे पुनरागमन?

मुंबई : टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध कॉमेडी शो ‘The Kapil Shrma Show’ मध्ये माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील विद्यमान मंत्री नवज्योत सिद्धू हा पुन्हा परतणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नुकत्याच एका अवॉर्ड शोमध्ये कॉमेडियन कपिल शर्मा याने सिद्धूच्या पुनरागमनाबद्दल सूचक असं वक्तव्य  केलं आहे. यामुळे सिद्धू शोमध्ये परतणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सध्या येणाऱ्या शोमधील नवीन …

'द कपिल शर्मा शो'मध्ये सिद्धूचे पुनरागमन?

मुंबई : टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध कॉमेडी शो ‘The Kapil Shrma Show’ मध्ये माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील विद्यमान मंत्री नवज्योत सिद्धू हा पुन्हा परतणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नुकत्याच एका अवॉर्ड शोमध्ये कॉमेडियन कपिल शर्मा याने सिद्धूच्या पुनरागमनाबद्दल सूचक असं वक्तव्य  केलं आहे. यामुळे सिद्धू शोमध्ये परतणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सध्या येणाऱ्या शोमधील नवीन भागात सिद्धू पुन्हा कार्यक्रमात दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. एका अवॉर्ड शोमध्ये कपिल शर्माला सिद्धू कार्यक्रमात पुन्हा परतणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कपिल म्हणाला, “सिद्धूबद्दल सध्या मी काही सांगू शकत नाही. कारण सिद्धू सध्या लोकसभा निवडणुकीत व्यस्त आहेत”. कपिलच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीनंतर सिद्धूचं शोमध्ये पुनरागमन होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, द कपिल शर्मा शोमधून सिद्धूला कार्यक्रमातून काढल्याने या कार्यक्रमालाही फटका बसला आहे. सिद्धू गेल्याने कार्यक्रमाचा टीआरपीही मोठ्या प्रमाणात घसरला असून निर्माते आणि चॅनलही चिंतेत आहे. याआधीही अभिनेता सलमान खानने सिद्धूला शोमध्ये पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केले होते.

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर सिद्धू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. सिद्धू म्हणाले होते की, “काही लोकांमुळे संपूर्ण देशाला गुन्हेगार समजणे चुकीचे आहे. हा एक भ्याड हल्ला होता, मी याचा विरोध करतो. हिंसा ही निंदनीय आहे. ज्यांची चूक आहे त्यांना शिक्षा व्हायलाच हवी”, असे म्हणत सिद्धू हे पाकिस्तानची बाजू घेताना दिसले होते. यामुळे त्यांचावर सर्वत्र टीका करण्यात आली होती. यामुळे सिद्धू यांना द कपिल शर्मा शोमधून हटवण्यात आलं आणि त्याऐवजी अभिनेत्री अर्चना पूरण सिंह यांना शोमध्ये एन्ट्री दिली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *