AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलायका अरोरा हिच्यासोबत अरबाज खान याने साजरा केला वाढदिवस? ते फोटो व्हायरल, दुसरी पत्नी शूरा खान…

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही मलायका दिसते.

मलायका अरोरा हिच्यासोबत अरबाज खान याने साजरा केला वाढदिवस? ते फोटो व्हायरल, दुसरी पत्नी शूरा खान...
Malaika Arora
| Updated on: Aug 08, 2024 | 12:01 PM
Share

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही दिसते. मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरूवात  केली. आता चर्चा आहे की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाले. तशा काही पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा असतानाच काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. अरबाज खान आणि शूरा खान यांच्या लग्नाला अत्यंत जवळचे लोक उपस्थित होते. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. विशेष म्हणजे वडिलांच्या लग्नात मलायकाचा लेक अरबाज खान हा धमाल करताना दिसला.

4 ऑगस्ट रोजी अरबाज खान याचा 57 वा वाढदिवस पार पडलाय. विशेष म्हणजे शूरा खान हिच्यासोबतच्या लग्नानंतरचा अरबाज खान याचा हा पहिल्याच वाढदिवस होता. शूरा खान हिने अरबाजच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. हेच नाही तर शूरा खान, अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी एकत्रच वाढदिवस साजरा केल्याची चर्चा आहे.

शूरा खान आणि अरबाज खान हे वाढदिवस साजरा करण्यासाठी विदेशात गेले. मुंबई एअरपोर्टवर शूरा खान आणि अरबाज खान स्पॉट झाले. विशेष म्हणजे शूरा खान आणि अरबाज खान हे एअरपोर्टमध्ये गेले त्यानंतर लगेचच एअरपोर्टवर मलायका अरोरा देखील पोहोचली. मलायका अरोरा अत्यंत घाई घाईमध्ये एअरपोर्टमध्ये जाताना दिसली.

शूरा खान आणि अरबाजने फोटोसाठी पोज दिली. मात्र, मलायका अरोरा ही फोटोसाठी पोज न देताच निघून गेली. शूरा खान, अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी एकत्रच वाढदिवस साजरा केल्याचे सातत्याने सांगितले जातंय. मात्र, याबद्दल तसा खुलासा हा होऊ शकला नाहीये. अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्यापासून मलायका अरोरा ही सतत विदेशात जाताना दिसत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?