AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check: सुशांतसोबत काय होणार नाना पाटेकरांना आधीच सर्वकाही माहित होतं? तनुश्री दत्ताच्या दाव्याचं सत्य

Fact Check: सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर नाना पाटेकर त्याच्या पाटण्यातील घरी पोहोचले होते. यावर तनुश्री हिने खळबळजनक दावा केला... पण तेव्हा नेमकं काय झालेलं आणि नाना केव्हा सुशांत याच्या घरी गेलेले... याबद्दल सर्वकाही जाणून घ्या...

Fact Check: सुशांतसोबत काय होणार नाना पाटेकरांना आधीच सर्वकाही माहित होतं? तनुश्री दत्ताच्या दाव्याचं सत्य
Nana Patekar
| Updated on: Oct 13, 2026 | 9:09 AM
Share

Fact Check: दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अद्याप इंडस्ट्री सावरलेली नाही. सर्वत्र शोककळा पसरलेली असताना अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणाशी नाना पाटेकर यांचं नाव घेत खळबळजनक दावा केवा आहे. सांगायचं झालं तर, नाना पाटेकर सुशांत याच्या पाटना स्थित घरी गेलेले. नाना, सुशांत याच्या घरी गेले तेव्हा दिवस आणि तारीख कोणती होती… यावर तनुश्री हिने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, तत्कालीन प्रसारमाध्यमांतील कव्हपेज, प्रत्यक्ष घटनास्थळावरील रिपोर्ट आणि अधिकृत अभिलेखांमधील नोंदींच्या आधारे, तनुश्री दत्ता हिच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे जाणून घ्या…

नुकतात झालेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकरांवर निशाणा साधत तनुश्री म्हणाली, ‘जेव्हा सुशांत याने टोकाचं पाऊल उचललं, त्या दिवशी त्याची खोली सकाळी 9.30 वाजता उघडी होती आणि 10 वाजेपर्यंत अभिनेत्यांच्या निधनाची माहिती कुटुंबियांपर्यंत पोहोचली. पण नाना पाटेकर त्याच दिवशी सकाळी 10 वाजत सुशांत याच्या पाटना येथील घरी पोहोचले होते. ते इतक्या लवकर सुशांत याच्या घरी पोहोचले कसे? त्यांना आधीच माहिती होतं की, काय होणार आहे?’ तनुश्री हिने नाना यांच्या वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

फॅक्ट चेक – काय आहे संपूर्ण प्रकरण?

तनुश्री दत्ता हिने केलेल्या दाव्यानंतर जेव्हा सर्व रिपोर्टची पडताळणी करण्यात आली, तेव्हा अभिनेत्रीने केलेल्या दाव्यात कोणतंच तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. सुशांत याचं निधन 14 जून 2020 रोजी झालं… त्यावेळी देशात कोरोना महामारी होती आणि लॉकडाऊन, प्रवासाबाबत सक्त नियम लागू करण्यात आलेले. सुशांत याच्या निधनाची माहिती मिळताच अभिनेत्याचे वडील के.के. सिंह आणि कुटुंबिय सुशांतला अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईत पोहोचले.

सुशांतवर 15 जून 2020 रोजी मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे, 14 जूनच्या सकाळी पाटण्यातील घरी कोणाचंही जाण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण त्याचं कुटुंबीय तोपर्यंत मुंबईसाठी निघालं होतं.

नाना पाटेकर पाटणा केव्हा पोहोचले?

तेव्हाच्या अधिकृत प्रसारमाध्यमांच्या नोंदी आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील वृत्तांनुसार, नाना पाटेकर सुशांतच्या निधनाच्या दिवशी नव्हे, तर तब्बल 14 दिवसांनंतर म्हणजेच 28 जून 2020 रोजी रविवारी पाटण्याला पोहोचले होते.

पाटण्याला का गेलेले नाना पाटेकर

नाना पाटेकर ‘सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स’ने (CRPF) आयोजित केलेल्या एका कल्याणकारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बिहारमधील मोकामा येथे आले होते. सीआरपीएफच्या जवानांची भेट आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर, 28 जूनच्या दुपारी त्यांनी पाटण्यातील राजीव नगर येथील सुशांत सिंह राजपूत यांच्या निवासस्थानी भेट दिली. सुशांत याच्या वडिलांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेकर यांनी फुल अर्पण करत सुशांत याला श्रद्धांजली वाहिली.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान