22 कोटींची मालकीण, अशा अवस्थेत सोडलं बॉलिवूड, 51 व्या वर्षीही अविवाहित

Choreographer Geeta Kapur Quits Bollywood: प्रत्येकाने एक पाऊल मागे घ्यायला हवं..., असं का म्हणाली सेलिब्रिटी महिला, अचानक बॉलिवूड सोडण्याचा का घेतला निर्णय, वयाच्या 51 व्या वर्षी जगतेय एकटीच आयुष्य, सध्या सर्वत्र सेलिब्रिटीची चर्चा...

22 कोटींची मालकीण, अशा अवस्थेत सोडलं बॉलिवूड, 51 व्या वर्षीही अविवाहित
फाईल फोटो
| Updated on: Jun 22, 2025 | 8:27 AM

Choreographer Geeta Kapur Quits Bollywood: प्रसिद्ध आणि लोकप्रिय कोरियोग्राफर गीता कपूर हिने बॉलिवूडचा निरोप घेतला आहे. गीता कपूर हिच्याबद्दल सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे तिने अद्याप लग्न केलेलं नाही. पण तरी देखील तिला प्रत्येक जण माँ म्हणून हाक मारतो. गीता आता 51 वर्षांची आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गीता कपूर हिने बॉलिवूड सोडण्याचं महत्त्वाचं कारण सांगितलं आहे. बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करण्याचा कोणताच हेतू नाही… असं गीताने स्पष्ट केलं आहे.

मुलाखतीत गीताला विचारण्यात आलं, बॉलिवूडमध्ये पुन्हा कधी पदार्पण करणार, ब्रेक घेऊन देखील बराच काळ झाला आहे? यावर गीता म्हणाली, ‘आता बॉलिवूडचा विचार करणं सोडलं आहे. प्रत्येकाने एक पाऊल मागे घ्यायला हवं आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी…’

‘दुसऱ्यांनी पुढे येण्याची आता वेळ आहे. या इंडस्ट्रीने मला जे काही दिलं. काम, पैसा आणि प्रसिद्धीच्या बाबतीत त्याचं जे काही आशीर्वाद होते, ते मला मिळाले आहे असं मला वाटतं. पण मला जरी कधी वाटलं चांगली संधी आणि हातातून नाही गेली पाहिजे तर मी नक्की पुन्हा विचार करेल..’

 

 

‘सध्या इंडस्ट्रीमध्ये कामाची प्रचंड तंगी आहे. अशात नव्या लोकांना देखील संधी मिळायला हवी. असं ही कामाची प्रचंड कमतरता आहे. आताच्या घडीला तसे सिनेमे देखील नाही बनत. ज्यामध्ये 8 – 10 गाणी आहेत. पूर्वी सिनेमांमध्ये डांसिंग गाणे होते. आता नव्या टॅलेंटने पुढे आलं पाहिजे… मी जिथे आहे तिथे आनंदी आहे..’ असं देखील गीता कपूर म्हणाल्या.

गीता कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 17 व्या वर्षी तिने करीयरला सुरुवात केली. फराह खानच्या ग्रुपमध्ये सामिल झाल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अनेक सिनेमांमध्ये तिने सहाय्यक कोरियोग्राफर म्हणून काम केलं आहे. ‘दिल तो पागल है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘मोहब्बतें’, ‘कल हो ना हो’, ‘मैं हूं ना’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये गीताने काम केलं आहे.