‘शेतकरी होण्याचं स्वप्न..’; संगीतकार नसते तर पापोनला का व्हायचं होतं शेतकरी?
प्रसिद्ध गायक पापोन यांनी टीव्ही9 ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या संगीत कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या आवडी-निवडीबद्दल सांगितलं. त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या तसेच जर ते संगीतकार नसते तर त्यांना शेतकरी होण्याची इच्छा होती. पण त्यांना शेतकरी होण्याची इच्छा का होती?

प्रत्येकाला लहानपणापासून कोणत्याना कोणत्या क्षेत्राचं आकर्षण असतं. काहीजण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करतात तर काही जणांची आवड नंतर दुसऱ्या क्षेत्रात निर्माण होते. तसंच काहीस बॉलिवूड सेलिब्रिटी ते गायक, दिग्दर्शक फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेल्या प्रत्येकासोबत घडलेलं असतं. या इंडस्ट्रीतील अनेकांना अभिनय क्षेत्रात येण्याआधी वेगळ्याच गोष्टीत रुची होती एवढंच नाही तर काहीजण या क्षेत्रात आल्यानंतरही त्यांनी आपली पहिली आवड जपून ठेवली आहे.
‘वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हल’
असंच काहीसं झालं आहे प्रसिद्ध गायक पापोन यांच्याबद्दल. पापोन यांना वेगळ्या अशा कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. सर्वांनाच त्यांची गाणी माहितीयेत. 14 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी व्हॅलेंटाईन डे निमित्त दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये टीव्ही9 नेटवर्कच्या ‘वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हल’ या कार्यक्रमात पापोन यांनी सादरीकरण केलं. त्यांनी आपल्या सुंदर आवाजाने वातावरणाते एक वेगळीत जादू निर्माण केली होती.
पापोन यांनी दिल्लीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला
दरम्यान टीव्ही 9 शी बोलताना पापोन यांनी दिल्लीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. पापोन यांचे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी दिल्लीतून पूर्ण केलं आहे. त्यामुले जेव्हा जेव्हा ते दिल्लीला येतात तेव्हा त्यांच्या आठवणी ताज्या होतात.
हे दिग्गज म्हणजे पापोनसाठी संगितातले देव
पापोन यांना लता मंगेशकर, किशोर कुमार आणि आर.डी. बर्मन हे दिग्गज म्हणजे त्यांच्यासाठी संगितातील देव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते या दिग्गजांचा आदर्श नेहमी समोर ठेवतात असंही सांगितलं आहे. पापोन यांनी असंही म्हटलं की या सर्वांचे गाणे ऐकतच ते मोठे झाले.
जर संगीतकार नसते तर पापोन शेतकरी असते
मुलाखतीमध्ये जेव्हा पापोनला विचारण्यात आलं की त्यांना लोकगीते किंवा बॉलीवूड गाणी यांपैकी जास्त काय आवड? तर त्यावर त्यांनी उत्तर देत म्हटलं की, त्यांना दोन्ही प्रकारची गाणी आवडतात. एवढंच नाही तर अमेरिकन गायिका नोरा जोन्ससोबत गाणे गाण्याची त्यांची इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलं.
बॉलिवूडला अनेक उत्तम गाणी दिली
जरी पापोनने बॉलिवूडला अनेक उत्तम गाणी दिली असली तरी त्यांच्यासाठी ‘प्रीतम दा’ यांची गाणी खूप खास असून ते संगीतबद्ध करण्याची संधी मिळाली असती तर करायला आवडलं असतं असं ते म्हणालेत. कारण त्यांच्यामते ‘प्रीतम दा’ गाण्याची खूप छान रचना करतात.
दरम्यान जेव्हा पापोनला विचारण्यात आलं की, जर ते संगीतकार नसते तर त्यांना कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडलं असतं? तर त्यांनी सांगितलं की ते जर गायक नसते तर त्यांना शेतकरी व्हायला नक्कीच आवडलं असतं.
या भाषांमध्येही गायली जाणारी गाणी
पापोनने हिंदीसोबतच तमिळ भाषेतही काम केलं आहे. त्यांनी पंजाबी, मराठी आणि बंगाली भाषांमध्येही गाणी गायली आहेत. त्यांच्या प्रत्येक गाण्याची, त्यांच्या आवाजाची प्रेक्षकांनी नक्कीच भुरळ पडते. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘सुल्तान’ चित्रपटातील ‘बुलेया’ या गाणे त्यांनीच गायल आहे. ‘खुद से’, ‘सुन जरा’, ‘तुम इतना जो’ ही त्यांची काही सर्वोत्तम गाणी आहेत.