So Expensive | नोरा फतेहीच्या ‘या’ ड्रेसची किंमत ऐकल्यानंतर बसेल धक्का!

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 31, 2021 | 10:06 AM

नोरा फतेही (Nora Fatehi) नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिड्ओ शेअर करत असते

So Expensive | नोरा फतेहीच्या 'या' ड्रेसची किंमत ऐकल्यानंतर बसेल धक्का!
Follow us

मुंबई : नोरा फतेही (Nora Fatehi) नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिड्ओ शेअर करत असते. नुकताच नोराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये तिने एक काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे तिचा हा फोटो चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. मात्र, तिने या फोटोत घातलेल्या ड्रेसची किंमत तुम्ही ऐकली तर तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसेल. नोराचा हा ड्रेस मेनका हरिसिंगानी यांनी स्टाईल केला आहे. मात्र, या ड्रेसची किंमत तब्बल 1,09,500 एवढी आहे. (Fans were shocked to hear the price of Nora Fatehi’s dress)

View this post on Instagram

A post shared by Maneka Harisinghani (@manekaharisinghani)

नोराने काही दिवसांपूर्वीच तैमूर अली खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. करिना कपूर खानच्या चॅट शोमध्ये नोराने तिच्या मनातली इच्छा बोलून दाखवली होती. नोरा म्हणाली होती की, तैमुर मोठा झाला की, मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे. हे नोराचे बोलणे ऐकून करिना आश्चर्यचकित झाली होती, करिना म्हणाली की, ठिक आहे पण तैमूर आता फक्त 4 वर्षाचा आहे त्याला लग्न करायला अजून बराच वेळ आहे. त्यावर नोरा हसत म्हणाली की, हरकत नाही तरीपण मी त्याच्यासाठी थांबेल.

नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर रेमो डिसूझाच्या ‘स्ट्रीट डांसर थ्रीडी’ चित्रपटात ती दिसली होती. अलीकडेच ती गुरु रंधावाच्या म्युझिक व्हिडिओ सिंगल ‘नाच मेरी राणी’ मध्येही दिसली. नोरा फतेही सध्या अभिषेक दुधैय्या यांच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. या चित्रपटात नोरा अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर सारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

संबंधित बातम्या : 

प्रेक्षकांसाठी मोठी बातमी, देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार, केंद्राची मोठी घोषणा!

Major : 26/11 चे हिरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना महेश बाबूंचा सलाम, ‘मेजर’ चित्रपटाची तारीख जाहीर

चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युटर्सने रिलीजसाठी हैरान केलं होतं, RRR च्या प्रोड्युसरचा खुलासा

(Fans were shocked to hear the price of Nora Fatehi’s dress)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI