Major : 26/11 चे हिरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना महेश बाबूंचा सलाम, ‘मेजर’ चित्रपटाची तारीख जाहीर

VN

|

Updated on: Jan 29, 2021 | 2:38 PM

तेलुगू सुपरस्टार महेश बाबूंच्या प्रॉडक्शन निर्मीत ‘मेजर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख रिलीज. (Mahesh Babu's salute to 26/11 hero Major Sandeep Unnikrishnan)

Major : 26/11 चे हिरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना महेश बाबूंचा सलाम, ‘मेजर’ चित्रपटाची तारीख जाहीर

Follow us on

मुंबई : तेलुगू सुपरस्टार महेश बाबूंच्या प्रॉडक्शनमध्ये तयार झालेल्या ‘मेजर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. चित्रपटाची तारीख जाहीर करण्यासोबतच चित्रपटाचं नवीन पोस्टरही शेअर केलं आहे. हा चित्रपट 2 जुलै 2021 रोजी रिलीज होईल.

हा चित्रपट ताज हॉटेलमध्ये 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अदिवी मुख्य भूमिकेत म्हणजेच संदीप उन्नीकृष्णनच्या भूमिकेत झळकणार आहे. तर शोभिता धुलीपाला आणि सई मांजरेकरसुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

यापूर्वी या चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं ज्यामध्ये आदिवि शेष मेजरच्या लूकमध्ये दिसला होता.

एका मुलाखतीत आदिवी त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना म्हणाला, संदीप उन्नीकृष्णन यांच्या कथेनं मी खूप प्रभावित झालो. मला आठवतंय की मी त्यांचा एक फोटो पाहिला होता जो सर्व चॅनेल्सवर दाखवला गेला होता. त्यांचा चेहरा पाहून ते मला माझ्या कुटुंबाचा भाग असल्यासारखे वाटले. नंतर मला कळलं की हे मेजर संदीप उन्नीकृष्णन आहेत ज्यांनी देशासाठी प्राण दिलेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक शशी किरण यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा ही घटना घडली तेव्हा आम्ही कोणीही तिथे नव्हतो. त्यावेळी बातमीत जे काही दर्शवलं गेलं ते आपल्या सर्वांना माहित आहे. आपण आपल्या कल्पनेतून जे काही दाखवितो त्यात वास्तवाचे रंग भरणे हे मोठं आव्हान आहे.

संबंधित बातम्या 

चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युटर्सने रिलीजसाठी हैरान केलं होतं, RRR च्या प्रोड्युसरचा खुलासा

‘बाप लेक’ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार, ‘आचार्य’ पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI