AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farah SRK | जेंव्हा दोन तास शाहरुख खान याच्यासमोर ढसाढसा रडली फराह खान, अभिनेत्याने थेट

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. विशेष म्हणजे याच्या या चित्रपटाने धमाका केलाय. शाहरुख खान आणि फराह खान यांच्या मैत्रीबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे.

Farah SRK | जेंव्हा दोन तास शाहरुख खान याच्यासमोर ढसाढसा रडली फराह खान, अभिनेत्याने थेट
| Updated on: Jun 05, 2023 | 3:26 PM
Share

मुंबई : शाहरुख खान आणि फराह खान (Farah Khan) यांचे एक अत्यंत सुंदर नाते आहे. शाहरुख खान याने फराह खान हिला आपली बहीण मानले आहे. इतकेच नाही तर फराह खान हिच्या लग्नामध्ये भावाच्या भूमिकेत शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा दिसला होता. शाहरुख खान आणि फराह खान यांनी मैं हूं ना, ओम शांति ओम अशा चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. शाहरुख खान आणि फराह खान हे दोघे कायमच एकमेकांच्या वाईट काळात साथ देतात. शाहरुख खान आणि फराह खान यांचे एकदम फॅमिली रिलेशन (Family relationship) आहे. शाहरुख खान हा फराह खान हिच्या वाईट काळात तिच्यासोबत होता.

फराह खान हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला. फराह खान म्हणाली की, मी माझ्या आयुष्यात ज्यावेळी अत्यंत वाईट काळातून जात होते. त्यावेळी मी शाहरुख खान याला फोन केला आणि मी फक्त ढसाढसा रडत होते. मी जवळपास शाहरुख खान याला फोनवर अर्धा तास बोलले. मात्र, मी त्यावेळी फक्त रडण्याचेच काम करत होते.

विशेष म्हणजे त्यावेळी शाहरुख खान हा त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. शाहरुख खान याने माझ्यासाठी शूटिंग अर्धेवट सोडून फोनवर बोलत बोलत माझे घर गाठले. त्यानंतर शाहरुख खान हा माझ्याजवळ दोन तास बसून होता. माझ्या वडिलांनंतर तोच माझी तेवढी काळजी घेतो, असेही फराह खान म्हणाली.

पुढे फराह खान म्हणाली की, माझ्या प्रत्येक वाईट वेळी शाहरुख खान याने मोठी साथ दिलीये. शाहरुख खान याने थेट एका पार्टीमध्ये फराह खान हिच्या नवऱ्याला थेट मारहाण केली होती. फराह खान हिचा पती शिरीष कुंदर आणि शाहरुख खान यांच्यामध्ये एका चित्रपटावरून वाद झाला होता, त्यानंतर एका पार्टीत शाहरुख खान याने गिरीषला मारहाण केली.

थेट पार्टीत शाहरुख खान याने फराह खान हिच्या पतीला मारल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, काही दिवसांमध्येच फराह खान हिने शाहरुख खान आणि शिरीष कुंदर यांच्यामधील वाद मिटवला. संजय दत्त याने अग्निपथ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये शिरीष कुंदर याने काहीतरी कमेंट ही शाहरुख खान याच्यावर केली होती. त्यापूर्वी शिरीष कुंदर हा सोशल मीडियावर शाहरुख खान याच्या विरोधात कमेंट करत होता.

Follow Us
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली