तब्बल 8 ते 9 वर्षांनी पाकिस्तानी अभिनेत्याची पुन्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री; चाहत्यांनी केला आनंद व्यक्त
तब्बल 8 ते 9 वर्षांनंतर हा पाकिस्तानी अभिनेता पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. हा अभिनेता जेव्हा सुरुवातीला बॉलिवूडमध्ये आला होता तेव्हाच त्याची फॅनफॉलोईंग जबरदस्त होती. आता त्याच्या पुनरागमनाचं चाहत्यांनी स्वागत केले आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींचे सर्वचजण फॅन आहेत. पण आपल्या बॉलिवूडमध्ये काही पाकिस्तानी अभिनेत्यांनीही काम केलं आहे आणि त्यांचंही एक फॅन फॉलोईंग आहे. पण काही कारणास्तव पाकिस्तानी अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये काम न करू देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर हे अभिनेते पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसले नाहीत.
पण आता तब्बल 8 ते 9 वर्षांनी एक पाकिस्तानी अभिनेता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. हे पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच छान वाटलं आहे. हा अभिनेता म्हणजे फवाद खान. तो पुन्हा एकदा भारतीय चित्रपटात दिसणार आहे. तो बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. फवाद ‘अबीर गुलाल’ नावाच्या चित्रपटातून बॉलिवूड एन्ट्री घेत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री वाणी कपूर त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. टीझरमध्ये फवाद आणि वाणीचा रोमान्सही पाहायला मिळत आहे. या टीझरची आणि फवाद खानच्या पुनरागमनाची सोशल मीडियावर एकच चर्चा होताना दिसत आहे.
टीझरमध्ये काय दाखवण्यात आलं आहे?
टीझरमध्ये फवाद आणि वाणी एका कारमध्ये बसलेले दाखवले आहेत. काही ना कहो हे गाणे फवादनेच गायले आहे. वाणी कपूर त्याच्या गायनाने प्रभावित झालेली पाहायला मिळत आहे आणि तिला हे गाणे खूप आवडते. यानंतर, फवाद खान वाणीकडे प्रेमाने पाहत गाणे पूर्ण करतो. मग वाणी विचारते की,”तू माझ्याशी फ्लर्ट करत आहेस का?” त्यावर फवाद म्हणतो की “मी फ्लर्ट करावं असं तुम्हाला वाटतं का?” आणि यानंतर टीझर संपतो. टीझरवरून तरी हा चित्रपट एक रोमँटीक प्रेमकहाणी असल्याचा अंदाज येत आहे.
View this post on Instagram
चित्रपटात अरिजीत सिंगच्या आवाजाची जादू
तसेच या रोमान्समध्ये चार चॉंद लावले आहेत ते अरिजीत सिंगने. या चित्रपटातही अरिजीत सिंगने आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना चित्रपटाचा टीझर खूप आवडला आहे. काही चाहते फवादच्या पुनरागमनाने आनंदी आहेत तर काही पाकिस्तानी अभिनेत्याला कास्ट केल्याबद्दल नाराजही आहेत. त्यामुळेवापरकर्त्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एका वापरकर्त्याने लिहिलं आहे “मेरा पिया घर आया रो राम जी”, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे ‘जग हील होत आहे. शेवटी तो एकोप्याचा माहोल परत आला’, तर एका वापरकर्त्याने लिहिलं, “अखेर फवाद पुनरागमन करत आहे”
फवादसोबत वाणी कपूरची जोडी घेतल्याने चाहत्यांची नाराजी
त्याच वेळी, काही चाहत्यांनी फवादसोबत वाणी कपूरची जोडी घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे. एका चाहत्याने लिहिले,” तुम्ही हीरोसमोर एक चांगली नायिका का आणली नाही? तिची आणि फवादची जोडी जुळत नाहीये.”
