Vijay Deverakonda | बॉलिवूड पदार्पणाआधीच विजय देवरकोंडा वादात! चित्रपट निर्मात्याने केले मोठे आरोप  

‘गीता गोविंदम’ फेम अभिनेता विजय देवेराकोंडा (Vijay Deverakonda) हा दाक्षिणात्य सिनेमाचा सुपर स्टार आहे. मेकर्स विजयला त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी अक्षरशः रांग लावून उभे आहेत. या अभिनेत्याने आतापर्यंत मोठ्या पडद्यावर अनेक सुपर हिट चित्रपट दिले आहेत. छोट्या कारकीर्दीतही विजयची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे.

Vijay Deverakonda | बॉलिवूड पदार्पणाआधीच विजय देवरकोंडा वादात! चित्रपट निर्मात्याने केले मोठे आरोप  
विजय देवरकोंडा

मुंबई : ‘गीता गोविंदम’ फेम अभिनेता विजय देवेराकोंडा (Vijay Deverakonda) हा दाक्षिणात्य सिनेमाचा सुपर स्टार आहे. मेकर्स विजयला त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी अक्षरशः रांग लावून उभे आहेत. या अभिनेत्याने आतापर्यंत मोठ्या पडद्यावर अनेक सुपर हिट चित्रपट दिले आहेत. छोट्या कारकीर्दीतही विजयची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. मात्र, आता विजयविषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका चित्रपट निर्मात्याने विजयवर मोठा आरोप केला आहे (Filmmaker Abhishek Nama says Vijay Deverakonda is very unprofessional actor).

बॉलिवूड लाईफच्या बातमीनुसार टॉलीवूडमधील एक प्रसिद्ध नाव, निर्माता-वितरक अभिषेक नामा यांनी विजय देवरकोंडावर मोठा आरोप लावला आहे. चित्रपट निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार विजय हा खूपच अनप्रोफेशनल अभिनेता आहे. यासह त्यांनी अभिनेत्यावर आणखी बरेच आरोप लावले आहेत.

विजय देवरकोंडा विरोधात आरोप

निर्माता-वितरक अभिषेक नामाने (Abhishek Nama) अलीकडेच ‘वर्ल्ड फेमस लव्हार’ या चित्रपटाचे आंध्र हक्क विकत घेतले होते. अशा परिस्थितीत अभिषेक नामा म्हणाले की, ‘वर्ल्ड फेमस लव्हर’चे हक्क विकत घेणे माझ्यासाठी आपत्ती होती. या चित्रपटात जितकी गुंतवणूकी केली आहे, त्यापैकी हा चित्रपट दहा टक्के रक्कमही गोळा करू शकला नाहीय. चित्रपटाच्या या अनपेक्षित निकालानंतर विजय देवेराकोंडाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अशा परिस्थितीत अभिनेत्याच्या अशा वागण्याने त्यांना अतिशय वाईट वाटले आहे. 2020च्या ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ या चित्रपटात विजय मुख्य भूमिकेत होता (Filmmaker Abhishek Nama says Vijay Deverakonda is very unprofessional actor).

विजयच्या वागण्याने दुखावला निर्माता

अभिषेक नामा यांनी असा दावा केला आहे की, विजय देवेराकोंडा याने त्यांच्या कोणत्याही कॉलला उत्तर दिले नाही. त्यांनी चित्रपटात केलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी 10% गुंतवणूकही अद्याप वसूल झालेली नाही. यासह, अभिनेत्याच्या अशा वर्तनामुळे तो खूप दुखावला गेला आहे. निर्माते-वितरक अभिषेक म्हणाले की, विजय अतिशय बेजबाबदारपणे वागला आणि आपला फोन देखील बंद केला आहे. जेव्हा एखादा चित्रपट आपली जादू दाखवण्यात अयशस्वी होतो, तेव्हा ही फिल्ममेकर्स आणि वितरकांची जबाबदारी असते. परंतु, तिच्या यशाचे संपूर्ण श्रेय मात्र नायकाला जाते, म्हणून जेव्हा एखादी फिल्म इतकी वाईट रीतीने अपयशी ठरते तेव्हा नायकाने देखील थोडी जबाबदारी स्वीकाराणे आवश्यक आहे.

विजयच्या उत्तराची प्रतीक्षा

या आरोपांना विजय देवेराकोंडा याने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. अभिनेता विजय देवेराकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तो अनन्या पांडेसमवेत ‘लायगर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. मात्र, कोरोनामुळे चित्रपटाचा टीझर स्थगित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या अगदी आधी विजयवर हे गंभीर आरोप केले गेले आहेत.

(Filmmaker Abhishek Nama says Vijay Deverakonda is very unprofessional actor)

हेही वाचा :

So Expensive : सोनम कपूरचा क्लासी अवतार, ड्रेसची किंमत लाखाच्या घरात

श्रिया सरनने सोशल मीडियावर शेअर केला गुलाबी बिकिनीतील बोल्ड फोटो, ‘कमबॅक’च्या चर्चांना उधाण!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI