Karan Johar | कपडे तर काढलेच आहेत आता काय लपवणार? करण जोहर याचे मोठे विधान, थेट म्हणाला, चित्रपट माफिया हे…

बाॅलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर हा कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो. करण जोहर याच्यावर सोशल मीडियावर देखील टिका केली जाते. करण जोहर हा त्याच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट रिलीज झालाय.

Karan Johar | कपडे तर काढलेच आहेत आता काय लपवणार? करण जोहर याचे मोठे विधान, थेट म्हणाला, चित्रपट माफिया हे...
| Updated on: Aug 09, 2023 | 3:52 PM

मुंबई : रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून करण जोहर (Karan Johar) हा जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट धमाका करताना दिसला आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे करण जोहर चर्चेत आहे. करण जोहरच्या या मुलाखतीमुळे अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे.

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आलिया आणि रणवीर सिंह हे दिसले. काही दिवसांपूर्वीच कश्मीर येथे रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचे शेवटे गाणे शूट करण्यात आले. आलिया भट्ट हिचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहेत.

दुसरीकडे मात्र, रणवीर सिंह याचे चित्रपट सतत फ्लाॅप जात होते. रॉकी और रानी की प्रेम कहानीने रणवीर सिंह याला मोठा दिलासा हा नक्कीच मिळाला आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठ्या विषयाला हात घालताना करण जोहर हा दिसला आहे. चित्रपट माफिया म्हणून गेल्या काही वर्षांपासून करण जोहर याला टार्गेट केले जात आहे.

शेवटी आता यावर भाष्य करताना करण जोहर हा दिसला आहे. नेपोटिझमचा गाॅड फादर देखील करण जोहर याला म्हटले जाते. करण जोहर म्हणाला की, सोशल मीडिया असो किंवा इतर ठिकाणे नेहमीच मी लोकांच्या निशाण्यावर असतो. मला चित्रपटांचा माफिया देखील म्हटले जाते. मात्र, या गोष्टींमुळे माझ्या आईला प्रचंड त्रास होतो.

माझी आई हीरू जोहर सोशल मीडिया, टीव्ही खूप जास्त पाहते. या दोन्ही ठिकाणी माझ्याबद्दल खूप काही बोलले जाते. याचा परिणाम माझ्या आईवर खूप जास्त होतो. गेल्या काही वर्षांपासून लोक माझ्याबद्दल खूप जास्त नकारात्मक झाल्याचे बघायला मिळत आहे. लोक सतत माझ्या विरोधात बोलतात आणि लिहितात.

या दरम्यान फक्त मला मजबूत राहिचे आहे, माझ्या आईसाठी आणि माझ्यासाठी. मी विचार करतो आता कपडे काढलेच आहेत मग आता काय लपवण्यासारखे आहे, कोणासोबत भांडणार. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी वादळे येतात. लोकांनी माझ्याबद्दल ते विचार त्यांच्या मनामध्ये करून ठेवले आहेत. त्यांना माहिती नाही मी कसा आहे ते. त्यांना मी कायमच माफिया वगैरे वाटतो.