AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर त्या व्हिडिओचं सत्य आलं समोर, सनी देओल म्हणाला प्यायची असेल तर…

सनी देओलचा एक व्हिडिओ सध्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो रस्त्यावर नशेत दिसत आहे. एक रिक्षावाला येतो आणि त्याला रिक्षामध्ये बसवतो. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूपच व्हायरल झाला होता. त्यानंतर सनी देओलला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. काय म्हणाला सनी देओल.

अखेर त्या व्हिडिओचं सत्य आलं समोर, सनी देओल म्हणाला प्यायची असेल तर...
Sunny-Deol
| Updated on: Dec 15, 2023 | 3:10 PM
Share

Sunny Deol viral video : अभिनेता सनी देओलचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो दारूच्या नशेत रस्त्यावर थिरकताना दिसत होता. हा व्हिडिओ इंटरनेटवर इतका व्हायरल झाला की, त्यावर सनी देओलला नंतर स्पष्टीकरण द्यावं लागलं. सनी देओलने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो चित्रपटाच्या एका सीनचे शूटिंग करताना दिसत आहे. त्याच्या आगामी ‘सफर’ चित्रपटासाठी रस्त्याच्या मधोमध हा सीन शूट केला जात होता. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत त्या व्हायरल व्हिडिओबद्दल सांगितले आहे.

सनीने त्याच्या व्हायरल झालेल्या मद्यधुंद व्हिडिओवर सांगितले की, “हे एका शूटचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. जर मला मद्यपान करावे लागले तर मी ते रस्त्यावर किंवा ऑटोरिक्षात करेल का? मी पीतच नाही. हा खरा व्हिडिओ नसून चित्रपटाच्या शूटिंगचा व्हिडिओ आहे.”

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच सनीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पडद्यामागचा व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्याला क्रू मेंबर्सनी घेरले होते. या व्हिडीओसोबत त्याने कॅप्शन लिहिले आहे की, “अफवांचा प्रवास फक्त इथपर्यंत.”

व्हायरल झाला होता व्हिडिओ

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सनी देओल रात्री सुनसान रस्त्यावर थिरकत होता. तेवढ्यात एक ऑटोचालक येतो आणि त्यांना लिफ्ट देतो. ऑटोचालक दारूच्या नशेत असलेल्या अभिनेत्याला रिक्षात बसवतो. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या होत्या.

सनी देओल दारू पीत नाही

सनी देओलने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की, तो दारू पीत नाही. अभिनेता म्हणाला होता, “नाही, मी हा प्रयत्न केला नाही, मी इंग्लंडला गेल्यावर प्रयत्न केला, पण मला समजले नाही की दारू इतकी कडू आहे, वास इतका वाईट आहे आणि नंतर डोके दुखते, त्यामुळे ती का प्यावी? त्याचा काही अर्थ नव्हता, म्हणून मी पुन्हा कधीच प्यायलो नाही.”

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...