इंडस्ट्रीमध्ये पहिली ऑनस्क्रिन किसिंग सीन देणारी अभिनेत्री, चित्रपट ठरलेला वादग्रस्त, भारतात चित्रपटावर बंदी

63 मिनिटांच्या चित्रपटात अभिनेत्रीने 4 मिनिटांचा दिलेला ऑनस्क्रिन किसिंग सीन, प्रेक्षक देखील झाले होते थक्क. भारतात या चित्रपटावर घालण्यात आली होती बंदी.

इंडस्ट्रीमध्ये पहिली ऑनस्क्रिन किसिंग सीन देणारी अभिनेत्री, चित्रपट ठरलेला वादग्रस्त, भारतात चित्रपटावर बंदी
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 09, 2026 | 1:09 PM

Indian Cinema First Kissing Scene: भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास शंभर वर्षांहून अधिक जुना आहे. देशात विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होतात आणि काळानुसार त्यांची मांडणी, तंत्रज्ञान तसेच विषयांमध्ये मोठा बदल झाला आहे. आजच्या काळात चित्रपटांमध्ये किसिंग सीन दाखवणे ही सामान्य बाब झाली असली तरी भारतीय सिनेमात पहिल्यांदा असा सीन कधी आणि कोणी दिला होता, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते.

भारतीय सिनेमात पहिल्यांदा किसिंग सीन 1933 साली दाखवण्यात आला होता. हा सीन Karma या चित्रपटात दाखवण्यात आला होता. हा चित्रपट ब्रिटिश दिग्दर्शक J. L. Freer Hunt यांनी तयार केला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत भारतीय सिनेमातील ‘फर्स्ट लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देविका राणी यांची निवड करण्यात आली होती.

देविका रानी यांचा धाडसी निर्णय

देविका राणी यांनी या चित्रपटात पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर किसिंग सीन दिला होता. त्यांच्या सोबत या चित्रपटात हिमांशु राॅय दिसले होते. विशेष म्हणजे, हे दोघे खऱ्या आयुष्यात पती-पत्नी होते. चित्रपटात दोघांमधील जवळपास 4 मिनिटांचा लिप-लॉक सीन दाखवण्यात आला होता, जो त्या काळात अत्यंत धाडसी आणि वादग्रस्त मानला गेला.

त्या काळात अशा प्रकारचा सीन दाखवणे ही खूप मोठी गोष्ट मानली जात होती. The Longest Kiss: The Life and Times of Devika Rani या किश्वर देसाई यांच्या पुस्तकातही या सीनचा उल्लेख आहे. या पुस्तकानुसार, त्या काळातील प्रेक्षकांना पडद्यावर असा सीन पाहून आश्चर्याचा धक्का बसला होता. 63 मिनिटांच्या या चित्रपटामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांना विश्वासच बसत नव्हता की भारतीय चित्रपटात असा सीन दाखवला जाऊ शकतो.

भारतात बंदी, परदेशात प्रसिद्धी

Karma या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आल्याचीही माहिती आहे. मात्र, परदेशात या चित्रपटाने चांगली प्रसिद्धी मिळवली. या वादग्रस्त सीनमुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना अपेक्षित आर्थिक यश मिळाले नाही.

आजच्या काळात चित्रपटांमधील किसिंग सीन सामान्य झाले असले तरी 1933 साली देविका राणी यांनी दिलेला सीन भारतीय चित्रपटसृष्टीत एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. त्या काळातील सामाजिक मर्यादा आणि प्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेता हा सीन अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारक ठरला होता.

Follow Us