AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSNLचा भन्नाट प्लॅन, 1 रुपयात मिळवा डेटा कॉलिंग, एसएमएससह सर्व काही…; जाणून घ्या फायदे

बीएसएनएलने आपला लोकप्रिय फ्रीडम प्लॅन पुन्हा सादर केला आहे. या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा घेता येणार आहे.चला तर मग आजच्या लेखात आपण या ऑफरचा लाभ किती दिवस घेऊ शकता आणि इतर फायदे जाणून घेऊयात.

BSNLचा भन्नाट प्लॅन, 1 रुपयात मिळवा डेटा कॉलिंग, एसएमएससह सर्व काही...; जाणून घ्या फायदे
BSNL
| Edited By: | Updated on: Apr 09, 2026 | 2:52 PM
Share

टेलिकॉम क्षेत्रात अनेक कंपन्यांनी मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवलेल्या आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहे. तसेच स्पर्धेच्या युगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक टेलिकॉम कंपन्या विविध ऑफर लाँच करत असतात. अशातच बीएसएनएल कंपनीने ग्राहकांच्या वाढत्या डिमांडनुसार फ्रीडम प्लॅन पुन्हा एकदा सादर केला आहे. ज्याची किंमत 1 रूपया आहे. तर या 1 रुपयाच्या प्लॅनमध्ये कोणत्या सेवा मिळतात आणि याचा फायदा कोणाला होतो? आजच्या लेखात तुम्हाला या प्लॅनबद्दल प्रत्येक माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बीएसएनएल फ्रीडम प्लॅनच्या फायदे समजतील. बीएसएनएलचा हा लोकप्रिय फ्रीडम प्लॅन मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही 30 एप्रिल 2026 पर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

बीएसएनएल १ प्लॅनबद्दल अधिक माहिती

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये फक्त 1 रुपयामध्ये ३० दिवसांच्या वैधतेचे नवीन सिम कार्ड आणि इतर सेवा मिळतात. हा प्लॅन जास्त पैसे खर्च न करता दैनंदिन वापरासाठी मूलभूत फायदे देतो. बऱ्याच लोकांना फ्रीडम प्लॅन उपयुक्त वाटू शकतो, कारण यामुळे त्यांना दुसरा नंबर घेता येतो किंवा वेगळे नेटवर्क वापरून पाहता येते. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी वैध आहे. अशातच या प्लॅनची वैधता संपल्यावर हा प्लॅन पुन्हा कधी येईल हे अद्याप सांगता येणार नाही.

बीएसएनएल फ्रीडम प्लॅन: फायदे

जेव्हा तुम्हाला नवीन सिम कार्ड मिळते, तेव्हा तुम्ही 30 दिवसांपर्यंत कोणत्याही व्यत्ययाशिवाय बीएसएनएलच्या विविध सेवांचा आनंद घेऊ शकता. ग्राहकांना संपूर्ण भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉल्स मिळतात. याव्यतिरिक्त तुम्हाला दररोज १०० एसएमएस मिळतात, जे कोणत्याही नेटवर्कवर पाठवता येतात.

बीएसएनएल फ्रीडम प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा देखील मिळतो, जो सामान्य इंटरनेट ब्राउझिंग, चॅटिंग आणि यूट्यूबवर व्हिडिओ किंवा इन्स्टाग्रामवर रील्स पाहण्यासाठी पुरेसा आहे. या प्लॅनची 30 दिवसांची वैधता नवीन बीएसएनएल सिम ॲक्टिव्हेट झाल्याच्या तारखेपासून सुरू होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास जर तुम्ही कंपनीकडून नवीन सिम खरेदी केले तर तुम्ही हे सर्व फायदे फक्त 1 रुपयामध्ये मिळवू शकता.

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.