AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oppo ने उडवली झोप, हुबेहुब आयफोनसारखे फीचर्स असलेला स्मार्टफोन आणणार; पाहा कधी होणार लाँच?

ओप्पो कंपनी एफ सिरीजचे दोन नवीन 5G फोन भारतीय बाजारात सादर करणार आहे. या दोन्ही फोनमध्ये कोणती वैशिष्ट्ये असतील आणि ते कधी लाँच होतील? चला जाणून घेऊयात.

Oppo ने उडवली झोप, हुबेहुब आयफोनसारखे फीचर्स असलेला स्मार्टफोन आणणार; पाहा कधी होणार लाँच?
Oppo F33 Pro
| Edited By: | Updated on: Apr 09, 2026 | 2:48 PM
Share

तुम्हाला या महिन्यात दोन नवीन स्मार्टफोन खरेदी करायचे असेल तर थोडे‍ दिवस थांबा कारण ओप्पो कंपनी त्यांचे नवीन दोन 5जी स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करणार आहे. तर Oppo F33 Pro 5G हा फोन पुढील आठवड्यात कंपनीच्या एफ-सिरीजचा भाग म्हणून लाँच करणार आहे. त्यातच Oppo F33 5G हा फोन देखील लाँच केला जाईल. कंपनीने केवळ लाँचची तारीखच नाही, तर प्रो व्हर्जनचे डिझाइन, फीचर्स आणि रंगांचे पर्याय देखील जाहीर केले आहेत. हा फोन स्टारी ब्लू, मिस्टी फॉरेस्ट आणि पॅशन रेड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. चला तर मग ओप्पो कंपनीच्या एफ सिरीजच्या या दोन स्मार्टफोनची लाँच तारीख आणि किंमत जाणून घेऊयात.

Oppo F33 Series भारतात लाँच होण्याची तारीख

Oppo F33 Pro 5G आणि Oppo F33 5G हे दोन्ही स्मार्टफोन 15 एप्रिल रोजी भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच केले जातील. Gadgets 360 नुसार हे फोन 50-मेगापिक्सलच्या प्रायमरी रियर कॅमेऱ्यासह, 2-मेगापिक्सलच्या डेप्थ कॅमेरा सेन्सरसह लाँच केले जाणार आहे.

F33 Pro 5G मध्ये 100-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि GC50F6 सेन्सरसह 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा असू शकतो. हा फोन ड्युअल-व्ह्यू व्हिडिओ आणि कलरफुल फ्रंट फिल लाइटला देखील सपोर्ट करेल. तर Oppo K33 Pro 5G मध्ये फ्लॅशलाइट, नॅचरल लाइट, रिम लाइट आणि स्टुडिओ लाइट कॅमेरा इफेक्ट्ससह AI पोर्ट्रेट ग्लो देखील असेल.

डिझाइनच्या बाबतीत या फोनबद्दल बोलायचे झाल्यास ओप्पो F33 प्रो 5G मध्ये एक आयताकृती रियर कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यामध्ये रिंग एलईडी फ्लॅश आणि दोन कॅमेरा लेन्स असू शकतात. पॅनलच्या खाली मध्यभागी ओप्पो ब्रँडिंग दिसेल आणि फोनला फ्लॅट बॅक व फ्लॅट फ्रेम असेल.

कंपनीचा दावा आहे की या हँडसेटला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP69K रेटिंग मिळेल. पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कंट्रोल्स फोनच्या उजव्या बाजूला असतील.

F33 प्रो चा डिस्प्ले आकार, प्रोसेसर, mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट याबद्दल माहिती अद्याप सांगण्यात आलेलं नाहीये. त्यात याव्यतिरिक्त F33 बद्दलची माहितीही अद्याप समोर येणं बाकी आहे की या फोनमध्ये कोणती वैशिष्ट्ये असतील.

Follow Us
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय.
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.