AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाज वाटायला पाहिजे तुम्हाला..; घटस्फोटाचा खुलासा करताच गौरव-आकांक्षावर भडकले नेटकरी

'लॉक अप 2'मध्ये अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोलाने त्यांच्या घटस्फोटाबद्दल धक्कादायक खुलासा केला. गेल्या वर्षभरापासून दोघं वेगवेगळे राहत आहेत. आमच्यात विवाहित जोडप्यासारखी भावनाच उरली नसल्याचं तिने म्हटलंय. आता नेटकरी या दोघांना ट्रोल करत 'ड्रामेबाज' म्हणत आहेत.

लाज वाटायला पाहिजे तुम्हाला..; घटस्फोटाचा खुलासा करताच गौरव-आकांक्षावर भडकले नेटकरी
Gaurav Khanna and Akanksha Chamola Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 29, 2026 | 8:58 AM
Share

‘बिग बॉस 19’चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नावर सध्या नेटकरी प्रचंड संतापले आहेत. गौरव आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्यावर चाहते जोरदार टीका करत आहेत. यामागचं कारण म्हणजे ‘लॉक अप सिझन 2’मध्ये आकांक्षाने केलेल्या त्यांच्या घटस्फोटाचा खुलासा. गेल्या वर्षभरापासून आम्ही वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार आहोत, असं तिने या शोमध्ये सांगितलं. इतकंच नव्हे तर, आमच्यात विवाहित जोडप्यांसारखी भावनाच राहिली नाही, असंही तिने म्हटलंय. हे ऐकून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. जर गेल्या वर्षभरापासून हे दोघं वेगळे राहत आहेत, तर मग ‘बिग बॉस 19’च्या फॅमिली वीकदरम्यान दाखवलेलं प्रेम आणि त्यांचा रोमान्स खोटा होता का, असा सवाल नेटकरी करत आहेत.

सोशल मीडियावर नेटकरी गेल्या वर्षभरातील आकांक्षा आणि गौरवचे व्हिडीओ शेअर करत आहेत. या सर्व व्हिडीओंमध्ये दोघं एकत्र आणि एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातही गौरव आणि आकांक्षा यांच्यातील रोमँटिक अंदाज पहायला मिळाला होता. या सर्व दिखाव्यामुळे नेटकरी संतप्त झाले असून त्यांनी या दोघांना ‘ड्रामेबाज’ असं म्हटलंय.

नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

‘बिग बॉस 19’च्या फॅमिली वीकदरम्यान गौरव खन्नाला पाठिंबा देण्यासाठी आकांक्षा शोमध्ये पोहोचली होती. त्यावेळी दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसले. त्यांचं नातं आधीच संपलंय हे माहीत असूनही सुखी विवाहित जोडप्याचं नाटक कसं करू शकतात, असा प्रश्न विचारत नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. मग हे सर्व फक्त रिअॅलिटी शोजसाठी होतं का, गौरव शोमध्ये चांगला नवरा दिसावा म्हणून हे सगळं केलं का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘लॉक अप सिझन 2’च्या प्रोमोवर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. ‘तुम्हा दोघांनाही लाज वाटायला पाहिजे’, असं एकाने लिहिलं. तर ‘आकांक्षा, तू खरंच खूप निर्लज्ज आहेस, तू गौरवच्या लायकीचीही नाहीस’, अशा शब्दांत दुसऱ्याने राग व्यक्त केला आहे. ‘गौरव खन्ना.. तू आणि तुझी पत्नी नेहमीच खोटे वागला आहात. बिग बॉसमध्ये जे दाखवलं, ते सर्व फक्त नाटक होतं’, असं आणखी एका युजरने म्हटलं आहे. काहींनी आकांक्षाने हे सर्व फक्त पब्लिसिटी स्टंटसाठी केला असल्याचाही दावा काही युजर्स करत आहेत. ‘लॉक अप 2’मध्ये टिकून राहण्यासाठी तिला एक गुपित उघड करायचं होतं, त्यामुळे लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी तिने असं सगळं सांगितलं, असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. यावेळी काहींनी अभिनेत्री रुबिना दिलैकचंही उदाहरण दिलं. बिग बॉसच्या घरात रुबिनानेही असाच खुलासा केला होता आणि नंतर ती शो जिंकली होती.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर