AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची तुफान चर्चा; नृत्यातून रंगवली राधिकेची कहाणी

‘कृष्ण सावळा रे’ हे गाणे ऐकताना जसं मन हरखून जातं, तसंच त्याचं दृश्यरूपही डोळ्यांना आणि मनाला एक अनोखा आनंद देतं. भक्ती आणि प्रेमाच्या या सुरेल संगमाने सजलेलं हे गाणं रसिकांच्या मनात दीर्घकाळ घर करणारं आहे. हे सुंदर गाणं सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची तुफान चर्चा; नृत्यातून रंगवली राधिकेची कहाणी
Gautami PatilImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2026 | 10:23 AM
Share

मनाला मोहणाऱ्या कृष्णाच्या सावळ्या रूपाची जादू आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या राधिकेची कोमल भावना.. या सुंदर नात्याचा सुरेल आविष्कार आता ‘कृष्ण सावळा रे’ या नव्या गाण्यातून रसिकांच्या भेटीला आला आहे. हे गाणे म्हणजे भक्ती, प्रेम आणि समर्पणाचा सुंदर संगम असून त्यातून राधिकाच्या कृष्णाप्रती असलेल्या भावना अतिशय भावपूर्ण पद्धतीने उलगडत आहेत. राधिकेच्या नजरेतून दिसणारा कृष्णाचा मोहक, खट्याळ आणि प्रेमळ चेहरा प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. यात विशेष आकर्षण ठरतं ते गौतमी पाटीलचं नृत्य.

आपल्या अदाकारीने आणि लयबद्ध हालचालींनी गौतमीने राधिकेच्या भावना इतक्या प्रभावीपणे साकारल्या आहेत की प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध होतात. तिच्या प्रत्येक हालचालीतून प्रेम, ओढ आणि समर्पण व्यक्त होतं. या नृत्याला अधिक खुलवण्याचं काम सिनेनृत्यदिग्दर्शक देवेंद्र शेलार यांनी केलं आहे. संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.

प्रसिद्ध छायाचित्रकार तेजस नेरुरकर यांच्या दिग्दर्शनाने या संकल्पनेला सुंदर दृश्यरूप दिलं आहे. अवंतिका बहिरट यांच्या अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी शब्दांना तरुण संगीतकार आदित्य पाटेकर यांच्या सुरेल आणि लक्षवेधी संगीताची जोड लाभल्याने हे गाणं अधिकच उठून दिसतं. सोनाली सोनावणे आणि आदित्य पाटेकर यांच्या आवाजातील गोडवा या गाण्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारा आहे.

या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं भव्य आणि नजरेत भरणारं सादरीकरण. संपूर्ण गाणं महाराष्ट्रीय संस्कृतीच्या साजाने सजलेलं असून पारंपरिक वेशभूषा, दागिने आणि रंगसंगती यामुळे एक खास बनत आहे. महाराष्ट्रीय पद्धतीने चित्रित केलेल्या या गाण्यातील प्रत्येक फ्रेममध्ये संस्कृतीची झलक दिसते, ज्यामुळे सादरीकरण अधिक उठावदार आणि भव्य वाटतं.

पहा व्हिडीओ-

या गाण्याबद्दल दिग्दर्शक तेजस नेरुरकर म्हणाला, “श्रीराधिकाजींच्या नजरेतून दिसणारे श्रीकृष्ण नेहमीच मोहक वाटतात. ते खट्याळ आहेत, प्रेमळ आहेत आणि तरीही गूढ आहेत. हीच त्यांची जादू या गाण्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, ही आमची इच्छा होती. गाणं चित्रित करताना अनेक अडचणी आल्या, मात्र देवाच्या कृपेने आम्ही त्या सर्व अडचणींवर मात केली. या सगळ्यात संपूर्ण टीमने खूप मनापासून काम केलं आहे. गीत, संगीत, गायन, सादरीकरण आणि विशेषतः नृत्य प्रत्येक घटक एकत्र येऊन या गाण्याला एक वेगळं सौंदर्य देतो. मला खात्री आहे की, हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल आणि त्यांच्या भावविश्वात एक खास स्थान निर्माण करेल.”

Follow Us
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत
Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत काय म्हणाले?
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितल
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितली A टू Z माहिती
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर विरोधकांचा मिळणार पाठिंबा, एकाऐकी काय घडलं?
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे 50 मिनिटांच्या बैठकीत...
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ.

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ

Ladki Bahin Yojana: आता लाडकी बहीण योजनेची… सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी; राज्य सरकार काय निर्णय घेणार?.

Ladki Bahin Yojana: आता लाडकी बहीण योजनेची… सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी; राज्य सरकार काय निर्णय घेणार?

शरद पवार NDA मध्ये जाणार का? सुप्रिया सुळे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले...

शरद पवार NDA मध्ये जाणार का? सुप्रिया सुळे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले..

आता लवकरच शाळा-कॉलेजात सेक्स एज्यूकेशन, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; थेट कोर्टाकडून….

आता लवकरच शाळा-कॉलेजात सेक्स एज्यूकेशन, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; थेट कोर्टाकडून…

Supriya Sule : तुम्ही हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा, जयंत पाटील यांच्या वर्षा बंगला भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.

Supriya Sule : तुम्ही हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा, जयंत पाटील यांच्या वर्षा बंगला भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule: तू गप्पबस, तुला कळत नाही…; सुप्रिया सुळेंना शरद पवार सर्वांसमोर असं का म्हणाले?.

Supriya Sule: तू गप्पबस, तुला कळत नाही…; सुप्रिया सुळेंना शरद पवार सर्वांसमोर असं का म्हणाले?