AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! गौतमी पाटील राजकारणात येणार? एका वाक्यात दिलं उत्तर

Gautami Patil : आज गौतमी पाटीलला राजकारणात प्रवेश करणार का याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना गौतमी पाटीलने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मोठी बातमी! गौतमी पाटील राजकारणात येणार? एका वाक्यात दिलं उत्तर
Gautami Patil DanceImage Credit source: Google
| Updated on: May 18, 2026 | 10:06 PM
Share

नृत्यांगणा गौतमी पाटीलने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेले आहे. तिचा डान्सचा कार्यक्रम पाहण्यासाठी खूप दूरवरून प्रेक्षक येत असतात. अशातच आज कुर्ला फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी जमली होती. अनेकदा कलाकार लोकप्रियतेचा फायदा घेऊन राजकारणात प्रवेश करत असतात. आज गौतमी पाटीलला राजकारणात प्रवेश करणार का याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना गौतमी पाटीलने नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या – गौतमी पाटील

कुर्ल्यातील कार्यक्रमानंतर बोलताना गौतमी पाटीलने म्हटले की, तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार, मला इतकं प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अनेक अविस्मरणीय अनुभव आहेत. महिला अत्याचार राज्यात वाढत आहेत, नराधमांना फाशी द्यायला हवी, कठोर कारवाई व्हायला पाहिजे. मी स्वत: महिला आहे. आम्हाला फार त्रास होतो असं विधान गौतमीने महिला सुरक्षेच्या प्रश्नावर बोलताना केले आहे.

राजकारणात प्रवेश करण्याबाबत गौतमी काय म्हणाली?

पुढे बोलताना गौतमीने सांगितले की, ‘मला आख्खा महाराष्ट्र आवडतो, जिथे जाते तिथली होऊन जाते. मुंबई आय लव्ह यू. अजित दादांनी मला खूप मदत केली, आम्ही कधी भेटलो नाही, पण दादांनी मला खुप मदत केली. त्यामुळे दादांची मला खुप आठवण येते. राजकारणात येणार का? या प्रश्नावर बोलताना गौतमीने म्हटले की, ‘मला राजकारणात यायचं नाही, मला फक्त डान्स करायचा आहे. लोकांचं मनोरंजन करायचं आहे.’

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी पाटील ही राज्यातील एक प्रमुख नृत्यांगणा आहे. ती राज्यातील विविध भागात डान्स कार्यक्रम घेते. एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची क्रेझ आहे. सोशल मीडियावर देखील गौतमी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. गौतमीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी नाही असं कधीच झालेलं नाही. गौतमी हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. कारण ती आपल्या कार्यक्रमात मराठी आणि हिंदी डीजे, रिमिक्स आणि ट्रेंडिंग गाण्यांवर डान्स करते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Follow Us
अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
Rohit Pawar On Jejuri Accident | अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत रोहित पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
Mumbai | ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई पोलिसांची मोठी धावपळ!
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
BJP Meeting | राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत... काय घडतंय?
देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! शरद पवारांनाही टाकले मागे
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांनाही टाकले मागे
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिरवा कंदील मिळणर?
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी..
Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी छाननी
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
Jejuri Vari Accident | भंडाऱ्याच्या उत्साहात काळाचा घाला! जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत