AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ग्रुपमध्ये मुली का टिकत नाहीत? मोठं कारण सांगत थेट म्हणाली, ‘लफडं तर…’

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गौतमी कायम तिच्या डान्सबद्दल सांगत असते. पण आता अभिनेत्रीने ग्रूपमधील मुली आणि नियमांबद्दल मोठी खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र गौतमी पाटील हिची चर्चा रंगली आहे.

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ग्रुपमध्ये मुली का टिकत नाहीत? मोठं कारण सांगत थेट म्हणाली, 'लफडं तर...'
गौतमी पाटील
| Updated on: Aug 19, 2026 | 1:02 PM
Share

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही, अनेक कार्यक्रम करत गौतमी हिने अनेकांच्या मनावर राज्य केलं. गौतमी तिच्या ग्रूपसोबत अनेक ठिकाणा सादरीकरण करत असते. ग्रूपमधील मुलींसाठी गौतमीने अनेक नियम ठरवून दिलेले आहेत. पण अशी देखील चर्चा रंगलेली असते की, गौतमीच्या ग्रूपमध्ये मुली फार काळ टिकत नाहीत… यावर गौतमीने मोठा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर, मुलींच्या प्रेम प्रकरणावर देखील गौतमीने मोठं वक्तव्य केलं आहे. गौतमी हिच्यानुसार, ग्रूपमध्ये जवळपास 11 मुली असतात.

ग्रूपबद्दल गौतमी म्हणाली,’चूक केली की, मी माफ करत नाही. एकदा चूक झाली, दुसऱ्यांदा चूक झाली… पण सतत होत असेल तर मी सांगते, तू सोडून जा.. पण काढल्यानंतर मी त्या मुलींना हडतूड करत नाही. त्या मुलींना देखील माझा सपोर्ट असतो. माझा स्वभाव आहे, मी एकदा माफ करणार, दुसऱ्यांदा माफ करणार. पण तिसऱ्यांदा पण करेल. पण सतत त्याच गोष्टी घडत राहिल्या तर, बाकीच्या मुली देखील चुका करणार.. माझ्या ग्रूपमध्ये फार स्ट्रिक्ट आहे…’

गौतमी पाटीलच्या ग्रूपमध्ये आल्यास काय करायचं आणि काय करायचं नाही? यावर गौतमी म्हणाली, ‘मी व्हॅनिटीच्या बाहेर मुलींना जास्त जाऊ देत नाही. व्हॅनिटीमध्येच थांबायचं. ज्या बॅक डान्सर आहेत त्या, स्टेजवरच असतात, त्यांच्यासोबत बाउंन्सर असतात. आमचं सर्वकाही ठरलेलं असतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या ग्रूपमध्ये आल्यानंतर लफडं बिलकूल करायचं नाही.’

पुढे गौतमी म्हणाली, ‘आज एकीला बाहेर सोडलं की, उद्या दुसरी करणार, तिसरी करणार. त्यामुळे हे मला पटत नाही, असं काही झालं तर, मी थेट त्या मुलीला काढून टाकते. मला आवडत नाही. कारण मला ग्रूप चालवायचा आहे. काम करायचं आहे. आज मझ्या ग्रुपमध्ये मुंबईच्या देखील मुली आहेत, ज्या पुण्यात कामाला येतात. माझ्याकडे राहतात पुण्यात येतात. आता त्यांची जबाबदारी कोणाची आहे. त्याचे आई – वडील आहेत, त्यांचे प्रश्न अशतात मुलगी गौतमीकडे चालली आहे कामाला. मुलींच्या आई बोलतात माझ्यासोबत, त्यामुळे ही मोठी जबाबदारी आहे.’ असं देखील गौतमी म्हणाली. सौमित्र पोटेंच्या मित्र म्हणे पॉडकास्ट गौतमी हिने तिच्या ग्रूप आणि नियमांबद्दल सांगितलं आहे.

Follow Us
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र