छोट्या पुढारीने गुडघ्यावर बसून मागितली ‘या’ अभिनेत्रीची चक्क माफी, लोकांचा संताप, थेट म्हणाले…

बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये मोठा धमाका होताना दिसतोय. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ नक्कीच बघायला मिळतंय. मोठी वाद देखील झाले आहेत. जान्हवी किल्लेकर हिने पॅडी कांबळेच्या करिअरबद्दल वादग्रस्त विधान केले, ज्यानंतर लोकांमध्ये संताप हा बघायला मिळाला.

छोट्या पुढारीने गुडघ्यावर बसून मागितली 'या' अभिनेत्रीची चक्क माफी, लोकांचा संताप, थेट म्हणाले...
Ghanshyam Darode
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 4:15 PM

बिग बॉस मराठीच्या घरात धमाका होताना दिसतोय. विशेष म्हणजे हे सीजन हंगामा करताना दिसत आहे. मुळात म्हणजे बिग बॉस मराठीच्या या सीजनकडून प्रेक्षकांना मोठी अपेक्षा ही नक्कीच आहे. अनेक दिग्गज कलाकार या सीजनमध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे वर्षा उसगांवकर या देखील जबरदस्त गेम खेळताना बिग बॉसच्या घरात दिसत आहेत. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना एक गेम दिला. मात्र, या गेममध्ये दोन्ही टीमला यश मिळाले नाही आणि दोन्ही टीम हरल्या. यानंतर बिग बॉसच्या निर्मात्यांकडूनच मोठा गेम खेळण्यात आला. यानंतर अरबाज पटेल याला चक्क आपली कॅप्टनशी सोडावी लागली.

अरबाज पटेल याने जरी घरातील सर्व सदस्यांसाठी आपली कॅप्टनशी सोडली असली तरीही त्यालाच निर्णय घ्यायचा होता की, बिग बॉसच्या घरातील पुढचा कॅप्टन कोण असणार. अरबाज पटेल याने सांगितले की, निकीचा बर्थडे काही दिवसांवर आहे आणि तिला बर्थडे गिफ्ट म्हणून मी कॅप्टनशी देऊ इच्छितो. कारण तिने मला बोलून दाखवले होते की, तिला बिग बॉसच्या घराचे कॅप्टन व्हायचे आहे.

अरबाज पटेल याने घरातील सर्व सदस्यांसाठी आपली कॅप्टनशी सोडल्याने सर्वांनी त्याचे काैतुक केले. हेच नाही तर आता निकी तांबोळी ही बिग बॉसच्या घराची नवीन कॅप्टन आहे. गेल्या भागामध्येच बिग बॉसच्या घरात घनश्याम दरोडे आणि निकी तांबोळी यांच्यामध्ये वाद बघायला मिळाला. दोघांमध्ये जोरदार भांडणे देखील झाली. आता असे काही घडले की, हे पाहून सर्वजण हैराण झाले.

नुकताच बिग बॉसच्या घरात निकी तांबोळी आणि घनश्याम हे बोलताना दिसले. यावेळी निकी तांबोळी ही घनश्याम याला म्हणाली की, तू खरे सांग…तू त्यांनी जसे सांगितले तसे बोलला नव्हता ना…यावर घनश्याम स्पष्टीकरण देताना दिसला. मी खरोखरच तसे बोललो नसल्याचे सांगताना छोटा पुढारी हा दिसला. हेच नाही तर पुढे छोटा पुढारी हा चक्क गुडघ्यावर बसून निकी तांबोळी हिची माफी मागताना देखील दिसला.

यानंतर निकी तांबोळी हिने देखील घनश्याम अर्थात छोट्या पुढारीला माफ केले. मात्र, छोट्या पुढारीने ज्याप्रकारे निकी तांबोळी हिची माफी मागितली हे लोकांना अजिबातच आवडले नाही. आता यावरून छोट्या पुढारीवर जोरदार टीका ही केली जातंय. अनेकांचे म्हणणे आहे की, गुडघ्यावर बसून निकीची माफी मागण्याची गरज घनश्यामला अजिबातच नव्हती.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.