AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी बराचवेळ त्याच्या कमरेला पकडून उभी होते’, गिरीजाने सांगितला मुंबई लोकलमधला तृतीयपंथीसोबतचा किस्सा

अभिनेत्री गिरीजा ओक सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत असते. तिचे मुलाखतीत तिने सांगितलेले किस्सेही आत हळू हळू व्हायरल होत आहेत. गिरीजाने सांगितलेला मुंबई लोकलमधील तिचा तृतीयपंथीसोबतचा हृदयस्पर्शी किस्सा देखील सध्या खूप चर्चेत आहे. नक्की काय घडलं होतं? हे जाणून घेऊयात.

'मी बराचवेळ त्याच्या कमरेला पकडून उभी होते', गिरीजाने सांगितला मुंबई लोकलमधला तृतीयपंथीसोबतचा किस्सा
Girija Oak Viral Mumbai Local Story, Empathy with Transgender PersonImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 20, 2025 | 4:14 PM
Share

‘न्यू नॅशनल क्रश’ बनलेली गिरीजा ओक सध्या बऱ्याच कारणांमुळे चर्चेत येत आहे. गिरीजा ओकने ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. त्यानंतर तिची मुलाखतीचे क्लिप्स इतके व्हायरल झाले की तिच्याबद्दलचे सर्वच अपडे्टस चाहते ठेवू लागले. तिच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आता व्हायरल होतात. तसेच तिचे मुलाखतीचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.

गिरीजाचा तृतीयपंथीबाबतचा एक अनुभव

सध्या तिचा असाच एक मुलाखतीमधील किस्सा व्हायरल होत आहे. तो किस्सा म्हणजे मुंबई लोकलमधला. मुंबई लोकलमध्ये किती गर्दी असते याचा अंदाजा आपल्या सर्वांनाच आहे. त्यात तृतीयपंथीदेखील बऱ्याचदा लेडीज डब्यातच चढतात. मराठी अभिनेत्री गिरीजा ओक देखील ऐके दिवशी लोकलने प्रवास करत असाताना तिला तृतीयपंथीबाबतचा एक अनुभव आला. जो तिने मुलाखतीदरम्यान सांगितला आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान आलेला अनुभव शेअर केला आहे. गिरीजाने त्याच्यासोबत असं काही केलं होतं की तृतीयपंथीने नंतर तिचे पाय धरून तिचं कौतुक केलं आणि आभार मानले.

गिरीजा ओकने सांगितला तो अनुभव 

गिरीजाने हा अनुभव सांगताना म्हटले की, ‘मी ट्रेन पकडत होते, खूप गर्दीच्या वेळी. आतमध्ये चढायला जागा नव्हती. मी त्या खांबाला पकडलं आणि मी उभे होते. ट्रेनही सुटणार होती. तृतीयपंथी ट्रेनमध्ये चढून पैसे मागतात, त्यापैकीच एक ट्रेनमध्ये चढला आणि जसा तो चढला, तेव्हा मी बाकीच्यांचे चेहरे बघितले. सगळे एकमेकांना चिटकूनच उभे होते, लेडीज डब्यात. तो चढला पण त्याला पकडायला काही नव्हतं. मला वाटलं तो खाली पडेल. मी त्याच्या बाजूलाच उभी होते. तो पडू नये म्हणून मी त्याला हाताने पकडलं. नाहीतर तो पडला असता.’

‘मी बराचवेळ त्याच्या कमरेला पकडून तशीच उभी होते…’

गिरीजा पुढे म्हणाली ‘त्या गर्दीत आम्ही तसेच उभे होतो, पुढचे काही स्टेशन येईपर्यंत. मी बराचवेळ त्याच्या कमरेला पकडून तशीच उभी होते. खूप स्टेशन गेले, गर्दी कमी झाली आणि त्या तृतीयपंथीने माझे पाय धरले. तो मला म्हणाला, ‘मी बाजूने जरी गेलो, तरी लोक सरकतात आणि तुम्ही मला पकडून ठेवलं आणि तुम्ही मला स्पर्श करू शकाल या पात्रतेचं मला समजलं.’ असं म्हणत त्याने गिरीजाचे आभार मानले. गिरीजाने सांगितलेल्या या अनुभवाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. आणि कौतुकही होत आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.