सिंपल ड्रेस, नो मेकअप; व्हायरल गर्ल गिरिजा ओकचा भाजी खरेदीचा व्हिडीओ व्हायरल; तिचा साधेपणा पाहून चाहते पुन्हा प्रेमात
मराठमोळी अभिनेत्री गिरीजाचे हिंदी पॉडकास्टमधील काही क्लिप्स व्हायरल झाले होते. त्यानंतर ती रातोरात 'नॅशनल क्रश' बनली. आत तिचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ती मार्केटमध्ये जाऊन भाजी खरेदी करताना दिसत आहे. गिरिजाने हा व्हिडीओ आणि एक खास कॅप्शन चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. व्हिडीओमधील तिचा नो-मेकअप लूक आणि घरातील कपड्यांमधील तिचा हा साधापणा चाहत्यांना खूपच भावला आहे.

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक रातोरात ‘नॅशनल क्रश’ बनली, ‘व्हायरल गर्ल’ बनली. तिच्या हिंदी पोडकास्टमधील काही क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या त्यानंतर तिच्या सौंदर्यापासून ते तिच्या साडीपर्यंत सर्वांचीच चर्चा होऊ लागली होती. ज्या हिंदी प्रेक्षकांना तिच्याबद्दल फारसं माहित नव्हतं ते प्रेक्षकही नंतर तिचे चाहते झाले. अचानक सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ, मालिका, चित्रपट सर्वांचीच चर्चा होऊ लागल्या. एवढंच नाही तर तिचे फॉलोअर्स देखील वाढले.
पोडकास्टमधील क्लिप्सनंतर गिरीजाचा अजून एक व्हिडीओ व्हायरल
पण गिरिजा ओक ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठी , हिंदी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये तिची स्वत:ची अशी एक ओळख निर्माण केली आहे. यामागे तिची अनेक वर्षांची मेहनत आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने अनेक हिंदी जाहिरातीही केल्या आहेत. तिच्या अभिनयासोबतच चाहते तिच्या सिंपल, साध्या लूकच्या आणि सौंदर्याच्या नेहमीच प्रेमात असतात. गिरिजाच्या साडीच्या व्हिडीओनंतर किंवा तिच्या पोडकास्टमधील क्लिप्सनंतर आता तिचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भाजी खरेदी करतानाचा गिरिजाचा व्हिडीओ
गिरिजाचा मार्केटमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बाजारात भाजी खरेदी करताना दिसत आहे. सिंपल घरातील कपडे, नो मेकअप अशा साध्या-सिंपल लूकमध्ये ती भाजी खरेदी करायला गेलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती एक चोखंदळ व्यक्ती आहे हे देखील दिसत आहे.कारण ती चांगली, ताजी भाजी कोणती आहे हे निवडून घेताना दिसत आहे. तसेच तिच्या हातात अनेक पिशव्या देखील दिसत आहेत.”
View this post on Instagram
“घर का खाना…”
दरम्यान गिरिजाने देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. “घर का खाना…” तसेच गिरिजाने पोस्टमध्ये 2 फोटोही शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती क्यूट स्माइल देताना दिसत आहे. असे वाटत आहे. जेवून तिचे मन तृप्त झाले आहे. तर दुसऱ्या फोटोत पंचपक्वानाचे ताट दिसत आहे. यात भात, डाळ, भाजी, अळूवडी आणि दोन चटण्या पाहायला मिळत आहे. तर व्हिडीओमध्ये गिरिजा बाजारात भाजी खरेदी करताना दिसत आहे. गिरिजाने या पोस्टला हे खास कॅप्शन दिलं आहे.
सिंपल-साधी राहणीमान प्रेक्षकांना खूपच आकर्षित करते
गिरिजा ओक उत्कृष्ट अभिनेत्रीसोबत तिला जेवण बनवण्याची देखील फार हौस आहे. कामाच्या व्यस्त शेड्यूलमधूनही ती वेळ काढून ती घरी स्वयंपाक करत असते. तसेच ती बाहेर खाण्यापेक्षा घरच्या खाण्याला जास्त महत्त्व देते. तिचा हा साधा स्वभाव, सिंपल-साधी राहणीमान प्रेक्षकांना खूपच आवडतं आणि आकर्षित करतं. गिरिजाचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तसेच तिच्या या व्हिडीओवर आणि पोस्टवर चाहत्यांनीही भरभरून कमेंट्स केल्या आहेत. तिचे कौतुक केले आहे.
