व्हायरल गर्ल गिरिजा ओकचा मरीन ड्राईव्हवरील किसिंग सीन व्हायरल; चित्रपटाचा असा होता अनुभव
निळ्या साडीतील व्हायरल गर्ल अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. तिच्या निळ्या साडीतील लूकचे कौतुक होत असतानाच, तिचा एका चित्रपटातील मरीन ड्राईव्हवरील किसिंग सीन चर्चेत आला आहे. हा सीन आणि तिचा पहिला किसिंग सीनचा अनुभव तिने एका मुलाखतीत शेअर केला होता. कोणता होता तो चित्रपट जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर सध्या एक अभिनेत्री प्रचंड व्हायरल होत आहे. या अभिनेत्रीने फक्त मराठीतच नाहीतर हिंदीमध्येही आपलं नाव कमावलं आहे. पण काही दिवसांपासून फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर निळ्या साडीतील एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लोक तिच्या सौंदर्याबद्दल तिच्यावर कमेंट्स आणि मीम्सचा वर्षाव करत आहेत, परंतु बहुतेक लोकांना ती कोण आहे याची कल्पना नाही.लोक विचारत आहेत की, निळ्या साडीतील ही रहस्यमय महिला कोण आहे? तर तिच ही मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले.
निळ्या रंगाची साडीतील व्हायरल गर्ल
गिरीजाने एका मुलाखतीदरम्यान नेसलेली निळ्या रंगाची साडी आणि त्यात खुललेलं तिचं सौंदर्य यामुळे तिचं प्रचंड कौतुक होत आहे आणि विशेषत: नेटकरी तिचे नाव सर्चही करत आहेत. तिचा हा साडीतील लूक लोकांच्या थेट हृदयात उतरला आहे. एका मुलाखतीमधील तिची क्लिप आता व्हायरल होत आहे. या मध्ये ती निळ्या रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल होऊन अचानक त्याला लाखो व्ह्यूज मिळाले. पण गिरीजाची खरी ओळख तिच्या अभिनय प्रतिभेत आहे, जी वर्षानुवर्षे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून तिने मिळवली आहे.
पहिल्यांदाच किसिंग सीन दिला
मराठीमोळी अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोलेचा हा साडीतील सुंदर लूकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता तिच्या हिंदी चित्रपटांबद्दल, तिच्या कामाबद्दलही बोललं जात आहे, सर्च केलं जात आहे. याच दरम्यान गिरिजाचा अजून एका चित्रपटाची आणि त्यातील एका सीनची बरीच चर्चा होत आहे.या चित्रपटामधील तिचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा चित्रपट म्हणजे ‘शोर इन द सिटी’ हा हिंदी चित्रपट. मुख्य म्हणजे तिने या चित्रपटात पहिल्यांदाच किसिंग सीन दिला होता. तिच्या या किसिंग सीनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. आणि आता तिचा हाच सीन पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
चक्क मरीन ड्राईव्हवर किसिंग सीन शूट
गिरिजाने चित्रपटात दिलेला हा किसिंग सीन चक्क मरीन ड्राईव्हवर शूट करण्यात आला होता. या सीनबद्दल तसेच तिच्या या पहिल्या किसिंग सीनचा अनुभवही गिरिजाने एका मुलाखतीत शेअर केला होता. किसिंग सीनबद्दल गिरीजा म्हणाली की, “मला पहिल्या किसबद्दल फारसं काही आठवत नाही आहे . पण मी एवढं नक्की सांगू शकते की, पहिल्या किसमुळे मला फार छान वाटलं नव्हतं. पहिला किस ही संकल्पनाच मला ओव्हररेटेड असल्यासारखी वाटते. कदाचित त्या सीनवेळी मी लहान होते. अगदी कॉलेजमध्ये होते त्यामुळे मला तेवढंस आवडलं नव्हतं.
या चित्रपटात गिरिजासोबतच, राधिका आपटे, निखिल द्विवेदी, तुषार कपूर, प्रीति देसाई असे अनेक कलाकार होते. या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं, या चित्रपटाच्या कथेच कौतुक झालं होतं. तसेच या चित्रपटातील गाणेही लोकांच्या पसंतीस उतरले आहेत.
