
नॅशनल क्रश गिरीजा ओक सध्या केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या गोड आवाजासाठीही चर्चेत आहे. मराठी, हिंदी आणि गुजराती सिनेमा-रंगभूमीवर गेली अनेक वर्षे सक्रिय असलेली गिरीजा ओक नुकतीच एका सुंदर गाण्याच्या व्हिडीओमुळे पुन्हा व्हायरल झाली आहे. तिने या गाण्याच्या व्हिडीओमध्ये ‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेता शरीब हाशमी (जेके) सोबत डुएटमध्ये गायले आहे. दोघांना एकत्र गाणे गाताना पाहून सर्वांना आनंद झाला आहे. काही जण चकीत देखील झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत निळ्या रंगाच्या साडीतील साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे गिरीजा देशभर ‘नॅशनल क्रश’ बनली. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले, ज्यामुळे अनेकांना तिच्या अभिनय कारकीर्दीचीही ओळख झाली. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तिने आपली छाप सोडली आहे. आता गिरिजाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडीओ?
गिरीजा फक्त उत्तम अभिनेत्रीच नाही, तर तिचा आवजही तितकाच मधुर आहे. नुकताच तिने ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ हे क्लासिक मराठी गाणं ‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेता शरीब हाशमी (जेके) सोबत डुएटमध्ये गायलं. दोघांनी मिळून हा व्हिडीओ शेअर केला असून, तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
शरीब हाशमीने हा व्हिडीओ पोस्ट करताना मजेशीर कॅप्शन लिहिलं, “तळपदे मीट्स मिसेस झेंडे ऑन TunesDay. थँक्यू गिरीजा ओक. आमची नॅशनल क्रश!” यातून शरीबचं मराठी बोलणं आणि गाणंही चाहत्यांना आवडलं. अनेक दिवसांनी गिरीजा गाताना पाहून तिच्या चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
या व्हिडीओवर गिरीजाचे नवरे सुह्रद गोडबोले यांची कमेंट विशेष चर्चेत आली आहे. त्यांनी “मालाड सुप्रिमसी” अशी मजेशीर कमेंट करत गिरीजाच्या गाण्याचं कौतुक केलं. सुह्रदही गिरीजावर फिदा झाल्याचं या कमेंटमधून दिसतंय आणि ती कमेंट आता व्हायरल होतेय. तसेच इतर कलाकारांनी देखील कमेंट्स करत गिरिजाचे कौतुक केले आहे. काहींनी तर शरीबच्या जेके पात्रावरुन कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने तर गिरिजावर फिदा झाल्याचे म्हणत, आम्ही तर सिंगलच मरणार अशी कमेंट केली आहे.