Govinda: सगळ्यांसमोर तमाशा केला, सुनिता अहुजावर गोविंदाचा मॅनेजर संतापला; घटस्फोटावर मोठं वक्तव्य

Govinda and Sunita Ahuja : सुनिता अहुजाने गोविंदाविरोधात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे. यावर आता गोविंदाच्या मॅनेजरने प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण इतकं का वाढू दिलं, असा सवाल मॅनेजरने सुनिताला केला आहे.

| Updated on: Aug 20, 2026 | 3:10 PM
1 / 5
Govinda and Sunita Ahuja: अभिनेता गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्यातील कौटुंबिक वाद जगजाहीर आहे. बुधवारी सुनिताला फॅमिली कोर्टाबाहेर पाहिलं गेलं, तेव्हा घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं होतं. मात्र नंतर गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा याने घटस्फोट होणार असल्याचं स्पष्ट केलं. सुनिताने घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याचं, शशीने सांगितलं.

2 / 5
याविषयी गोविंदाचा मॅनेजर मीडियाशी बोलताना म्हणाला, "सुनिताने घटस्फोटाची याचिका मागे घेणं ही आनंदाची गोष्ट आहे. पण या प्रकरणाला इतकं वाढूच का दिलं? गेल्या दीड ते दोन वर्षांपासून माध्यमांमध्ये त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल चर्चा सुरू आहेत. यामुळे विनाकारण दोघांच्याही प्रतिमेला धक्का पोहोचला आहे."

3 / 5
"नात्यांमध्ये मतभेद होणं स्वाभाविक आहे, पण जेव्हा एखादा वाद कोर्टापर्यंत पोहोचतो, तेव्हा ती गोष्ट सार्वजनिक बनते. ही गोष्ट टाळता आली असती. सुनिता यांना कोर्टात जाण्याची काहीच गरज नव्हती. घरातल्या गोष्टी या घरातच राहिल्या पाहिजेत. बसून संवाद साधल्याने अनेक गोष्टी ठीक होतात. आज जर खटला मागे घ्यायचा होता, तर मग याचिका दाखलच का केली? या गोष्टीचं मला फार वाईट वाटतंय. आम्ही उगाच का तमाशा बनलो", असा सवाल मॅनेजरने उपस्थित केला.

4 / 5
याप्रकरणी गोविंदाकडून कोणतीच प्रतिक्रिया नसल्याचंही मॅनेजर शशीने स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले, "देव सर्वांना सदबुद्धी देवो, सर्वांनी बुद्धीने निर्णय घ्यावेत. हेच चांगलं आहे. कुटुंबातील संभ्रम आणि गैरसमज आपापसांत बसून चर्चेनं सोडवता येऊ शकतात. समस्या मोठी असू शकते, परंतु ते सोडवणं अशक्य नसतं."

5 / 5
गोविंदा आणि सुनिता अहुजा यांनी मार्च 1987 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांनी 1988 मध्ये मुलगी टीनाच्या जन्मापर्यंत लग्नाची बातमी गुप्त ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सुनिताने 5 डिसेंबर 2024 रोजी वांद्रे फॅमिली कोर्टात गोविंदाकडून घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. यामध्ये व्यभिचार, क्रूरता आणि परित्यागाचा हवाला देण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us