‘गुम हैं किसी के प्यार में’ मालिकेतील नील ऐश्वर्याचं जमलं!, रोका सेरेमनीचे खास फोटो शेअर

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 27, 2021 | 6:46 PM

कोरोनाच्या काळात संपूर्ण बॉलिवूड अनलॉक होतं. आता जसजसा कोरोनाच्या काळ सरतोय तसंतसं अनेक सेलिब्रेटी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेत आहेत.

'गुम हैं किसी के प्यार में' मालिकेतील नील ऐश्वर्याचं जमलं!, रोका सेरेमनीचे खास फोटो शेअर

मुंबई : कोरोनाच्या काळात संपूर्ण बॉलिवूड अनलॉक होतं. आता जसजसा कोरोनाच्या काळ सरतोय तसंतसं अनेक सेलिब्रेटी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. मग तो लग्नाचा असो वा रिलेशनशीप ऑफिशियल करण्याचा… काही महिन्यांपूर्वी टीव्हीवर सुरु झालेल्या ‘गुम हैं किसी के प्यार में’ या सिरीयलमध्ये विराट आणि पाखीची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्माने आपलं नवं नातं जगासमोर आणलं आहे. दोघांनीही आपण रिलेशनशीपमध्ये असल्याचं जाहीर करत रोका सेरेमनीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.( Gum hai Kisi ke pyaar Mai Serial Star neil Bhatt And Aishwarya Sharma relationship official Share Roka Ceremony)

नील आणि ऐश्वर्याच्या नव्या नात्याने त्यांच्या चाहत्यांना अत्यानंद झालाय तर दुसरीकडे त्यांना धक्का बसलाय. धक्का यासाठी बसलाय की सिरीयलमध्ये तो दोघे एक्स लव्हर्सची भूमिका साकारत आहेत. आणि खऱ्या आयुष्यात मात्र दोघांनीही प्रेमाचा वसंत फुलवलाय. ऐश्वर्या आणि नीलने आपल्या सोशल मीडियावर रोका सेरेमनीचे काही खास फोटो शेअर करत लिहिलंय, “एकमेकांबरोबर केलेली मस्ती, केलेला दंगा आणि प्रेम…. आता आम्ही आयुष्यभरासाठी एक झालो आहोत….”

गुम हैं किसी के प्यार में या सिरीयलमध्ये नील भट्टचं ऐश्वर्यावर प्रेम असतं परंतु काही कारणांनी त्याचं लग्न ऐश्वर्याशी होत नाही. आता भलेही सिरीयलमध्ये प्रेयसी त्याची आयष्यभराची साथीदार होऊ शकली नाही परंतु रिअल आयुष्यात मात्र त्याने प्रेयसीला आपली आयुष्यभराची सोबती बनवलीय.

नील आणि ऐश्वर्या लवकरच लग्न करणार आहेत. त्यांची मैत्रीण आशना किशोरने याबाबत पोस्ट लिहून त्यांच्या लग्नाची माहिती दिली आहे. नील-ऐश्वर्याचे फोटो पोस्ट करत ती म्हणते, “माझा प्रिय मित्र आणि मैत्रीण लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ही आनंदाची गोष्ट सांगताना मी शब्दात सांगू शकत नाही की मी किती खूश आहे. ऐश्वर्या तुला तुझ्या आयुष्यात खूप चांगला साथीदार मिळाला आहे जो तुझी आयुष्यभर खूप चांगली काळजी घेईन…”

नील आणि ऐश्वर्याची गुम हैं किसी के प्यार में या मालिकेच्या सेटवरच ओळख झाली. याचदरम्यान त्यांची खूप चांगली मैत्री जमली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यापुढे जाऊन आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय…

संबंधित बातम्या : 

धार्मिक भावना दुखावणे अयोग्यच; ‘तांडव’च्या निर्मात्यांना अंतरिम संरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

( Gum hai Kisi ke pyaar Mai Serial Star neil Bhatt And Aishwarya Sharma relationship official Share Roka Ceremony)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI