AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Ansh: ना दारू, ना नॉनव्हेज; इस्कॉन मंदिरात अशी रंगली ‘हनुमान अंश’ची सक्सेस पार्टी

Hanuman Ansh: 'हनुमान अंश' हा प्रसिद्ध आध्यात्मिक संत नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याचा आणि आध्यात्मिक प्रवासाचा वेध या चित्रपटातून घेण्यात आला आहे. विशाल चतुर्वेदी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Hanuman Ansh: ना दारू, ना नॉनव्हेज; इस्कॉन मंदिरात अशी रंगली 'हनुमान अंश'ची सक्सेस पार्टी
'हनुमान अंश'ची सस्केस पार्टीImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 15, 2026 | 12:44 PM
Share

Hanuman Ansh: बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट हिट झाला की त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा आलिशान रेस्टॉरंटमध्ये सक्सेस पार्टी आयोजित केली जाते. मात्र, यावेळी एका चित्रपटाच्या टीमने यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने आनंद साजरा केला आहे. ‘हनुमान अंश’ या चित्रपटाच्या 100 दिवसांच्या यशानिमित्त मुंबईतील जुहू इथल्या इस्कॉन मंदिरात खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यननेही हजेरी लावली. विशेष म्हणजे, या पार्टीत ना दारू होती, ना नॉनव्हेज पदार्थ! पाहुण्यांसाठी सात्त्विक शाकाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे या अनोख्या सेलिब्रेशनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

इस्कॉन मंदिरात कार्तिक आर्यनची हजेरी

‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवलं आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्मात्यांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात या यशाचा आनंद साजरा केला. या कार्यक्रमाला अभिनेता कार्तिक आर्यनही उपस्थित होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कार्तिक कार्यक्रमस्थळी पोहोचताना, चित्रपटाच्या टीमची भेट घेताना दिसत आहे. त्याने या सोहळ्यात भजन किंवा आरतीमध्येही सहभाग घेतल्याचं व्हिडीओमधून दिसतं.

पहा व्हिडीओ-

ना दारू, ना मांसाहार; पाहुण्यांसाठी सात्त्विक भोजन

सामान्यतः बॉलिवूडमधील सक्सेस पार्ट्यांमध्ये मोठ्या हॉटेल्समधील मेजवानी, संगीत आणि ग्लॅमरस वातावरण पाहायला मिळतं. मात्र, ‘हनुमान अंश’च्या टीमने चित्रपटाच्या आध्यात्मिक विषयाला साजेसं सेलिब्रेशन करण्याचा निर्णय घेतला. या पार्टीमध्ये मद्यपान आणि मांसाहारी पदार्थांना पूर्णपणे फाटा देण्यात आला होता. पाहुण्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि सात्त्विक भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. चित्रपटाच्या संकल्पनेशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी सुसंगत असा हा सोहळा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या पार्टीची बॉलिवूडमध्ये विशेष चर्चा होत आहे.

‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई

‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुरुवातीला फारशी कमाई केली नव्हती. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने भारतात केवळ 1.08 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई कमीच होती. मात्र, तिसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाच्या कमाईत अचानक मोठी वाढ झाली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात 342.86 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली असून जगभरातील एकूण कमाई 453.33 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला फारशी दखल न घेतलेल्या या चित्रपटाने नंतर ब्लॉकबस्टर यश मिळवलं.

Follow Us
अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
Sanjay Shirsat : अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती